शिवभोजन झोपडपट्टी भागात सुरू करा
जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावात गोरगरीबांना दिलासा म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली असून शिवभोजन केंद्र झोपडपट्टी भागात सुरू करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली आहे.
गर्दी कमी होईना
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान रस्त्यांवर गर्दी अजूनही कायम आहे. रस्त्यावर चाचणी केली जात असली तरी नागरिक घरात थांबत नसून बाहेर फिरतच असल्याचे चित्र आहे.
वाढते अतिक्रमण
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपायोजना म्हणून गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र तरीदेखील अतिक्रमण वाढतच आहे. रामानंद नगर परिसर ते गिरणा टाकी भागात भाजीपाला विक्रेते वेगवेगळ्या ठिकाणी बसत असल्याने येथे खरेदीसाठी गर्दी होत आहे.
रस्त्याची डागडुजी
जळगाव : गिरणा टाकी ते मू.जे. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आलेल्या खोदकामाच्या ठिकाणी डागडुजी करण्यात आली. मात्र रस्त्यांवर पूर्वीपासून असलेले खड्डे अजूनही कायम असल्याने वाहनधारकांचे हाल होत आहे.