जळगाव : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ४६० गावांमध्ये ६ वर्ष कालावधी (सन २०१८-१९ ते २०२३-२४) पर्यंत कृषी व्यवसाय स्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, संघ व प्रकल्पासाठी निवड झालेल्या गावातील नोंदणीकृत शेतकरी गटांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले़ या प्रकल्पातंर्गत अनुदानावर प्रकल्प कार्यरत झाले असून प्रकल्प उभारणीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़
कृषी व्यवसायासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 9:36 PM