आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ८ - सर्वच क्षेत्रात आघाडी घेतलेल्या महिलांनी आता किडनी दानातही आघाडी घेतली असून यामुळे गरजूंना जीवदान मिळण्यास मदत होत असल्याचे सुखद चित्र आहे.मार्च महिन्याच्या दुस-या गुुरुवारी किडनी दिन साजरा केला जातो. यंदा महिला दिन व किडनी एकाच दिवशी आले असून या पार्श्वभूमीवर किडनी विकार व महिलांची स्थिती या बाबत आढावा घेतला असता किडनीदानामध्येदेखील महिलांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.महिलांमध्ये १४ टक्के तर पुरुषांमध्ये १२ टक्के प्रमाणमहिलांमध्ये मृत्यूचे आठवे प्रमुख कारण म्हणजे किडनी किकाराचे आहे. यात दरवर्षी जगभरात क्रोनिक किडनी विकाराने मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. महिलांमध्ये जवळ-जवळ क्रोनिक किडनी विकाराचे प्रमाण १४ टक्के तर पुरुषांमध्ये १२ टक्केपर्यंत आहे.उपचाराबाबत दक्ष रहावेमहिलांमध्ये किडनी विकाराचे प्रमाण अधिक असले तरी आर्थिक, सामाजिक कारणांमुळे महिलांमध्ये औषधोपचार, उपचाराबद्दल उदासिनता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यात किडनी प्रत्यारोपणचे प्रमाणही कमी आढळते; मात्र किडनी दानात महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे सुखद चित्र आहे.किडनी विकारात महिलांचेक्रोनिक किडनी विकाराचे प्रमाण महिलांमध्ये जवळ-जवळ १४ टक्के तर पुरुषांमध्ये १२ टक्केपर्यंत आहे. किडनी दानात महिलांचे प्रमाण अधिक आहे.- डॉ. शशिकांत गाजरे.अवयव दानामध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असल्याने ही एक सकारात्मक बाब आहे. किडनी प्रत्यारोपणात कोणताही धोका नाही. त्यामुळे यासाठी पुढे आले पाहिजे.डॉ. अनिल पाटील.
किडनीदानातही महिलांची आघाडी, उपचाराबाबतही काळजी घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:06 PM
महिलांमध्ये किडनी विकाराचे प्रमाण अधिक असल्याने काळजी घेणे महत्त्वाचे
ठळक मुद्देउपचाराबाबत दक्ष रहावेमहिलांमध्ये १४ टक्के तर पुरुषांमध्ये १२ टक्के प्रमाण