ऑनलाईन लोकमत जामनेर : ग्रा.पं.निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तालुक्यातील करमाड येथील ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु असताना सरपंचपदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी गेलेल्या उमेदवाराने चुकून ग्रा.पं. सदस्यपदासाठी अर्ज भरला. एकही अर्ज न आल्याने या गावातील सरपंचपदाचा गुंता वाढला आहे. प्रशासनाने देखील याबाबत निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन मागविले आहे. करमाड येथील ग्रा.पं.निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न सुरु केले. सरपंचपदाचे आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी निघाले आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी अमृत मोतीराम सोनवणे यांच्या नावावर एकमत झाले. ठरल्याप्रमाणे सोनवणे हे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी गेले. मात्र त्यांच्याकडून चुकून सरपंचपदाऐवजी ग्रामपंचायत सदस्यपदाचा अर्ज भरला गेला. सोनवणे यांचा सरपंचपदाचा अर्ज बाद झाल्याने सर्वाचीच निराशा झाली. 9 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत सदस्यपदासाठी आता 13 जणांचे अर्ज दाखल आहेत.
सरपंचऐवजी भरला सदस्यपदासाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:23 AM
जामनेर तालुक्यातील करमाड येथे सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने पेच निर्माण झाला आहे. मात्र ग्रा.पं.च्या सदस्यपदासाठी 13 अर्ज प्राप्त झाले आहेत.
ठळक मुद्देसरपंचपदासाठी नाव ठरलेल्या उमेदवाराकडून चुकीमुळे घोळनिवडणूक अधिका:यांनी मागविले मार्गदर्शनसरपंचपद बिनविरोध करण्याच्या ग्रामस्थांच्या प्रय}ांना खीळ