जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हाभरात २६३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यात चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक ३२ अर्ज बाद झाले आहेत. जिल्हाभरात १५ तालुक्यात मिळून २० हजार २७६ अर्ज दाखल झाले होते. त्यातून २६३ अर्ज बाद झाले आहेत. त्यात रात्री उशिरापर्यंत पारोळा तालुक्याची आकडेवारी मिळू शकलेली नाही.
दिवसभर जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात छाननीमध्ये किरकोळ वाद सुरू होते. अनेकांच्या अर्जावर हरकत घेण्यात येत होती. त्यातून २६३ अर्ज बाद झाले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण बाद झालेले अर्ज-
तालुका आणि बाद अर्ज -
जळगाव १५, जामनेर ३०, धरणगाव २४, भुसावळ ८, मुक्ताईनगर १०, बोदवड ९, यावल ६, रावेर ३१, अमळनेर २९, चोपडा ८, पाचोरा ३०, भडगाव ७, चाळीसगाव ३२