यावल, जि.जळगाव : शहरास पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या सध्याच्या तलावाव्यतिरिक्त अतिरिक्त साठवण तलावाच्या तीन कोटी १४ लाख ३१ हजारांच्या कामाच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे दोन्ही तलाव एकदा भरले तर किमान पाच महिने शहरास पाणी टंचाई भासणार नसून, उन्हाळ्यातील टंचाई दूर होणार आहे.यावल शहरास हतनूर धरणावरून पाटचारी मार्गे यावल शहरातील साठवण तलावात पाणीसाठाी केला जातो. १९९९ मध्ये ३०० एमएलडी क्षमतेच्या तलावाचे काम होऊन शहरास पाणीपुरवठा केला जातो. तेव्हापासून तलावातील गाळ न काढल्याने तसेच तलावास गळती होत असल्याने तलावाची साठवण क्षमता कमी झाल्याने शहरास ४५ ते ५० दिवसच पाणीपुरवठा होऊ शकतो. ही अडचण लक्षात घेऊन पालिकेने २२ फेब्रुवारी व १३ मार्च २०१७ च्या सर्वसाधारण सभेत नवीन साठवण तलाव बाधण्याच्या विषयास मंजुरी घेतली होती मात्र साडेतीन वर्ष होऊनदेखील या तलावाचे काम रखडले. प्रभारी नगराध्यक्ष नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्या कारकीर्र्दीत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी या कामाचा पाठपुरावा करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून तांत्रिक मंजुरी मिळवून तातडीने प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी चौदाव्या वित्त आयोगातील योजनेतून तीन कोटी १४ लाख ३१ हजार ८६ रुपयांच्या कामाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. ही माहिती नगराध्यक्ष नौशाद तडवी व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली आहे.दोन्ही तलावामुळे शहरास पाच महिने साठा पुरेलदोन्ही तलाव भरल्यानंतर शहरास हा साठा किमान पाच महिने पुरेल. हतनूर धरणातून वर्षभरासाठी सहा ते सात आवर्तन घ्यावे लागत होते. आता वर्षातून फक्त चार आवर्तण मिळाली तरी शहराची तहान भागवता येणार आहे. तसेच आता तलावातील गाळ काढणेही सोपे जाईल कारण एक तलाव भरलेला असला म्हणजे शहरवासीयांसाठी अडचण भासणार नाही. केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आनंद झाल्याचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी सांगितले.
यावल येथे अतिरिक्त साठवण तलाव प्रस्तावास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 7:34 PM
शहरास पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या सध्याच्या तलावाव्यतिरिक्त अतिरिक्त साठवण तलावाच्या कामाच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
ठळक मुद्देयावल शहरास किमान पाच महिने पाणी पुरणारगाळ काढण्याची सुविधाही होणार