भडगाव : नाभिक समाजातील जुन्या अहीतकारी रुढींना फाटा देत पोट जातींमध्ये रोटी-बेटी व्यवहार करणे व साखरपुडा पद्धत बंद करणे आदी विविध क्रांतीकारी ठराव येथे झालेल्या नाभिक समाजाच्या राज्यस्तरीय प्रबोधन मेळाव्यात करण्यात आले.नाभिक समाज मंडळाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र स्तरीय प्रबोधन मेळाव्याचे आयोजन मंगळवारी येथील लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात करण्यात आले होते. मेळाव्यास जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर आदी जिल्ह्यांसह गुजराथ मधील बडोदा, सुरत, नवसारी व मध्यप्रदेशातील भोपाल, इंदोर, सेधवा, खेतीया येथील नाभिक समाजातील सर्व पोट जातींचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. हरचंद सोनवणे नंदुरबार, रामभाऊ शिरसाठ खेतिया, आर. डी. महाले धुळे, वामनराव सुर्वे धुळे, पुरुषोत्तम निकम सुरत, दामोदर बिडवे बुलढाणा, शंकरराव वाघ निफाड, किशोर सुर्यवंशी जळगाव, कथ्थु संैदाणे नदुरबार, संतोष खोंडे, मुकुंद धजेकर, राजकुमार गवळी, सुधाकर सनांसे भुसावळ, सुनिल बोरसे चाळीसगाव, चुडामण बोरसे, बाजीराव सोनवणे, अनिल सोनवणे, दिपक महाले, सचिन निंबाळकर, सुंनदा सुर्वे, भारती सोनवणे जळगाव, प्रा. अॅड. विद्या बोरनारे तसेच मिनाक्षी भदाणे नंदुरबार यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते . यावेळी समाजाचे जिल्हा अध्यक्ष एकनाथ शिरसाठ यांनी सामाजिक रूढी परंपरा या कालानुरूप बदल करणे आवश्यजक असल्याचे सांगितले.हे ठराव झाले मंजूरनाभिक समाजातील आहेर, मराठा, तायडे, दखनी, मारवाडी, गुजराथी, गुजर या पोटजातीत रोटी-बेटी व्यवहार सुरु करणे.लग्न समारंभात आहेर घेणे-देणे प्रथा बंद करणेबाबत चर्चा करणे.साखरपुडा पध्दत बंद करणे.नोकरी करणाऱ्या जावायाचा आग्रह न धरता व्यवसाय करणाºया तरुणास प्राधान्य देणे.विवाह वेळेवर लावणे व विवाह समारंभात सत्कार टाळणे.दरवर्षी जिल्हा पातळीवर वर-वधु परीचय मेळावा घेण.समाजातील वाढते वादविवाद व घटस्पोटाचे प्रमाण लक्षात घेता जिल्हास्तरावर न्याय निवारण समिती स्थापन करणे.अंत्यविधी , दशक्रिया, उत्तरकार्य यातील रूढीत बदल करून कार्यक्रम साधारण करणे.विवाहात मानपान बंद करणे.मुलीच्या डिलिव्हरीच्या खर्चात मदत करणे.स्थळ पाहण्यासाठी नातेवाईकांचा खर्च कमी करणे.मेळावा यशस्वीतेसाठी संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळ भडगावचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नरेंद्र महाले , मनोहर खोंडे , त्रिवेणी सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक संजय पवार , भरत चव्हाण यांनी केले. आभार हिलाल नेरपगारे यांनी मानले .
नाभिक समाजात पोट जातींमध्ये रोटी-बेटी व्यववहारास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 6:42 PM