शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या प्रस्तावाविषयी सोमवारी समितीची बैठक झाली. समितीसमोर एकूण १६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी नऊ प्रकरणे पात्र ठरली आहेत. उर्वरित दोन प्रकरणे अपात्र तर पाच प्रकरणे फेरचौकशीसाठी स्थगित ठेवण्यात आली आहेत.
पात्र शेतकरी
पिरन बुधा पाटील (नागदुली, ता. एरंडोल), रवींद्र आनंदा ऊर्फ आधार पाटील (मुंदाणे प्र.ऊ., ता. पारोळा), गुलाब खंडू पाटील (लोणी खु., ता. पारोळा), विठ्ठल लटकन पाटील (रा. धुळपिंप्री, ता. पारोळा), युवराज देवराम पाटील (लोण बु., ता. अमळनेर), जिजाबराव माधवराव पाटील (रा. सबगव्हाण, ता. अमळनेर), किशोर लक्ष्मण पाटील (झाडी, ता. अमळनेर), रावसाहेब जालिंदर निकम (चिंचगव्हाण, ता. चाळीसगाव), किशोर रमेश नारखेडे (भादली बु., ता. जळगाव).