आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२९ - जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आयोजित पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण समारंभ जैन हिल्स येथे आकाश मैदानात शुक्रवार ३० मार्च रोजी सकाळी ११.४५ वाजता होत आहे. पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार असतील.विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कृषी, फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी मंत्री, आमदार एकनाथराव खडसे उपस्थित राहतील. उपस्थितीचे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व संचालक मंडळ तसेच भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे ना.धों. महानोर, दलीचंद जैन व विश्वस्त मंडळाने केले आहे.ठिबक सिंचनासह आधुनिक कृषी उच्च-तंत्राचा वापर करून अनेकविध कृषी प्रयोगपद्धतीद्वारे बहुमोल योगदान व लक्षणीय उत्पादनार्थ ‘पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार’ देण्यात येतो. वर्ष २०१६ च्या पुरस्काराचे वितरण या समारंभात होणार असून या पुरस्काराचे मानकरी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील अविनाश मनोहर पाटोळे हे ठरले आहेत.
जळगावात आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कारांचे उद्या वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 19:38 IST
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शरद पवार यांच्या उपस्थितीत अविनाश पाटोळे यांना पुरस्कार वितरण
जळगावात आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कारांचे उद्या वितरण
ठळक मुद्देयंदाच्या पुरस्काराचे मानकरी अविनाश पाटोळेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थितीजैन हिल्स येथील आकाश मैदानावर होणार पुरस्कार वितरण