आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २८ - जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागले असून जामनेर तालुक्यातील पहूर ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरपंच प्रदीप लोढा यांंच्या २५ वर्षांच्या सत्तेला भाजपाने सुरूंग लावत स्पष्ट बहुमत मिळविले आहे.जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात भाजपाचे वर्चस्व असले तरी गेल्या २५ वर्षांपासून पहूर ग्रामपंचायत आघाडीच्या ताब्यात होती. गेल्या वेळीदेखील भाजपाचा निसटता पराभव झाला होता. यावेळी मात्र भाजपाने १८ पैकी १० जागांवर विजय मिळवित सत्ता मिळविली आहे. प्रदीप लोढा यांच्या गटाला ८ जागा मिळाल्या आहे.मंगळवारी जिल्ह्यात झालेल्या मतदानावेळी काही मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. तर काही मतदान केंद्रांवर मात्र सकाळी व दुपारी मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला. जळगाव तालुक्यात नंदगाव फेसर्डी ग्रा.पं.त सर्वाधिक ८९.९४ टक्के मतदान झाले. येथे सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. त्यापाठोपाठ बेळी येथे ८८.९३ टक्के, करंज-धानोरे खुर्द येथे ८७.२२, आमोदे बु.।। ७८.९४ टक्के मतदान झाले. नशिराबाद येथे पोटनिवडणुकीसाठी ५८.१७ टक्के मतदान झाल े होते.
पहूर ग्रामपंचायतीमध्ये २५ वर्षांच्या आघाडीच्या सत्तेला भाजपाकडून सुरुंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:34 PM
सत्ता परीवर्तन
ठळक मुद्देसरपंचपदाच्या नीता पाटील विजयी१८ पैकी १० जागांवर विजय