ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 8 - भगवान महावीर यांची प्रतिमा असलेले प्राचीन काळातील एक रुपयांचे नाणे भुसावळातील कमलकुमार जैन यांच्या अफाट संग्रहात आहे. ९ रोजी साजरी होणाऱ्या भगवान महावीर जयंती निमित्त त्यांनी भगवान महावीर यांचे प्राचीन नाणे ‘लोकमत’कडे उपलब्ध करुन दिले.
भगवान महावीर यांची प्रतिमा असलेले हे नाणे १६१६ मध्ये इस्ट इंडिया कंपनीने काढले आहे. या नाण्याचे मूल्य एक रुपया इतके असल्याची माहिती जैन यांनी दिली.
या शिवाय जैन यांच्या संग्रहात पर्शियन देवता ‘झूअस’ यांची प्रतिमा असलेले दोन डॉलरचे चांदीचे नाणे व आफ्रिकन देशातील पलावू प्रांताने भारतीय सरस्वती देवीचे काढलेले चांदीचे एक डॉलरचे नाणे आणि सोनेरी पॉलिस असलेले चांदीचे कॅलेंडर असलेले नाणे असा अमूल्य ठेवा जैन यांनी जोपासला आहे. असा आहे जैन यांचा संग्रह४विविध प्रकारची आणि अनेक देशातील जुनी व नवीन नाणी.विविध प्रकारच्या चलनी नोटा, पोस्टाची तिकिट, मोघलकालीन नाणी,शिवकालीन नाणी,पोस्टाची पाकीट, राष्ट्र पुरुषांची तिकिट व त्यांच्या जन्म तारखेनुसार चलनी नोटा, आॅलिम्पीकची नाणी, तिकिटे असा त्यांचा अफाट संग्रह आहे.