जळगाव, दि. 7 - केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ रावेर तालुक्याने व्यापले आहे. मात्र किरकोळ ठिकाणी नवीन लागवड करण्याचा अपवाद वगळता क्षेत्रफळाच्या तुलनेत लागवड शून्य आहे. भूगर्भातील पाण्याचा स्त्रोतावर आधारीत कूपनलिका व विहिरींच्या पाणी पातळीच्या नियोजनावर नवीन लागवड करण्याचे तंत्र अवलंबून आहे.जिल्ह्यातील केळी लागवडीचे एकूण क्षेत्रफळ सन 2015-2016 मध्ये 48 हजार 280 हेक्टर एवढे होते. 2016-2017 मध्ये त्यात वाढ होऊन ते सुमारे 51 हजार हेक्टर क्षेत्रफळ इतके झाले आहे. यात सर्वाधिक क्षेत्रफळ व्यापणारा रावेर तालुक्याची व्याप्ती 19 हजार 773 हेक्टर क्षेत्रफळ सर्वसाधारण केळीने व्यापले आहे. एवढय़ा क्षेत्रफळातील केळी आता पुढे कापणीस सज्ज झाली असून पाणीपुरवठा व उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतक:यांची रंगीत तालीम सुरू झाली आहे. एप्रिल महिन्यात नवीन केळी लागवड करण्यास शेतकरी फारसा धजावत नाही. कारण पावसाळा व हिवाळा या ऋतुमध्ये नवीन केळी व जुनारीमधील रब्बीचे आंतर पीक मका, गहू व हळद, तूर या पिकांचे पाणी भरण्याचे नियोजन करून पाणी देणे शक्य होते. हिवाळय़ातील चार महिन्यांमध्ये केळी बागेला सतत पाण्याची गरज नसते. अनेक शेतक:यांच्या जमिनी आजही तयार आहे. परंतु पाण्याच्या नियोजना अभावी लागवड उशिरा केली जात आहे. रामनवमीला केली जाते लागवड रावेर व यावल तालुक्यात काही भागात रामनवमीनंतर केळी लागवडीचा मुहूर्त काही शेतकरी साधतात. याला शेतकरी भाषेत रामबाग म्हणून ओळखले जाते.देशी बियाणे झाले हद्दपार..केळी लागवडीत सध्या टिश्युकल्चर ग्रॅडनेन या जातीने शेतक:यांना भुरळ घातली आहे. टिश्युच्या प्रथम कापणीनंतर निघणा:या कंद लागवडवर आजही सामान्यत 70 टक्के शेतकरी अवलंबून आहे. यापूर्वीचे देशी वाण श्रीमंती, अर्धापुरी, वसई, सातमासी श्रीमंती या देशी वाणांची उत्पादक क्षमता कमी असल्याची केवळ ओरड केली जाते. मात्र दर्जा, गोडवी व कोणत्या तरी वातावरणात उन्हामध्ये कमी-अधिक पाण्याचा ताण सहन करणा:या देशी वाणांच्या जाती विकसित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. यामुळे अत्यंत तकलादू व विविध रोगांना बळी पडणा:या टिश्युकल्चर ग्रॅडनेन या विदेशी जातीला प्राधान्य दिले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात केळी लागवडीचे क्षेत्रफळ वाढले
By admin | Published: April 07, 2017 4:59 PM