अनेक दिवसांपासून संयम पाळलेला नेत्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. माझे नाव घ्यायचे नाही. महिला म्हणून जाऊ देतो...असे सांगत वाद सुरू झाला. महिला नेत्याने लागलीच गटविकास अधिकाऱ्याला लक्ष्य केले. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून एका महिला कार्यकर्तीने संघटनेच्या त्या महिलेस शासकीय कार्यालयात वाद घालत आहात. ३५३ प्रमाणे सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे कानात सांगताच या भांडखोर कार्यकर्ती महिलेचा चेहरा फटकन उतरला आणि चढलेला आवाज खाली करीत हळूहळू तेथून काढता पाय घेतला. तरीही या पंचायत समिती कार्यालयातून तिच्या पतीकडे अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याबाबत निरोप पोहोचला. मग घरीच वादावादी सुरू झाली.
- चुडामण बोरसे