लोकमत ऑनलाईन यावल, जि.जळगाव, दि. 19 : येथील मुख्य रस्त्यावरील दुकानांच्या ओटय़ावर फटाके फोडण्यास मनाई केल्याच्या कारणावरून दोन गटात उद्भवलेल्या वादात दगडफेक होऊन एकजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठला घडली. दोन्ही गटाकडील लोकप्रतिनिधींनी परिस्थिती तत्काळ आटोक्यात आणली. घटनेचे वृत्त कळताच फैजपूर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, सपोनि योगेश तांदळे व सहका:यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली असून शहरात शांतता प्रस्थापित केली. येथील मुख्य रस्त्यावरील दुकानांच्या ओटय़ावर फटाके फोडण्यास परिसरातील नागरिकांनी मनाई केल्याच्या कारणावरून दोन गटात वाद उद्भवला व दगडफेकीस सुरवात झाली. लगतच राहत असलेले हाजी शब्बीरखान मोहम्मदखान, प्रवीण धोडके, नगरसेवक राकेश कोलते, धीरज महाजन, माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे, शरद कोळी, कबीरखान, नगरसेवक शेख असलम, राजू फालक यांनी दोन्ही गटाकडील लोकांना शांत केले. त्यामुळे परिस्थिती तत्काळ आटोक्यात आली. घटनेचे वृत्त कळताच सपोनि योगेश तांदळे, फौजदार सुनीता कोळपकर घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग तत्काळ शहरात दाखल झाले असून त्यांनी घटनेचा आढावा घेतला. तालुक्यातील उसमळी येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा दौरा असल्याने येथील पोलीस ठाण्याचे बहुतांश कर्मचारी सातपुडय़ात बंदोबस्तास असल्याने शहरात तोकडा बंदोबस्त होता. दिवाळीच्या दिवशी जो बंदोबस्त लावावयास पाहिजे तो न लावल गेला नसल्याचाही आरोप नागरिकांकडून होत आहे. रात्री उशिरार्पयत याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
फटाके फोडण्यावरून दोन गटात वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 1:10 AM
जळगाव जिल्ह्यातील यावल येथील घटनेत दगडफेक, एक जण जखमी
ठळक मुद्देपोलीस यंत्रणा वेळीच दाखल झाल्याने टळला अनर्थलोकप्रतिनिधींचाही शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहभागपोलिसांचा बंदोबस्त कायम