ऑनलाईन लोकमत
जळगाव दि,23 : चाकूचा धाक दाखवून सुरेश रमेश पाटील (वय 32 रा.गणपती नगर, पिंप्राळा, जळगाव, मुळ रा. कासोदा) यांच्या घरात दरोडा टाकून चोरटय़ांनी 45 ग्रॅम सोने व 41 हजार रुपये रोख असा पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची थराराक घटना गुरुवारी पहाटे अडीच वाजता पिंप्राळ्यातील गणपती नगरात घडली. याच परिसरात हुडको रस्त्यावर सिध्दार्थ नगरात याच चोरटय़ांनी रिक्षा चालकाच्या घरातून 13 हजार रुपये रोख चोरुन नेले. दोन्ही घटना या अध्र्या तासाच्या अंतराने घडल्या आहेत.खासगी नोकरीला असलेले सुरेश पाटील हे प}ी प्रिती, मुलगी खुशी व मुलगा अरमान यांच्यासोबत गणपती नगरात राहायला आहेत.गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घराचा मागील दरवाजा लोखंडी टॅमीने तोडून दोन चोरटे घरात शिरले. आवाज झाल्याने उठून पाहिले असता त्यातील एका हिंदी भाषेतून बोलून चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर कपाटातील 35 हजार रुपये रोख प}ीचे 30 ग्रॅम सोने, चुलत भाऊ अनिल पाटील याच्या खिशातील सहा हजार रुपये, त्याची प}ी सोनू हिचे 15 ग्रॅम सोने असा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला.
दोन चोर घरात तर तीन बाहेरघरात येताना दोन जण आले. एकाच्या हातात तलवार तर दुस:याच्या हातात चाकू होता. तीन घराच्या बाहेर होते. ते बाहेरुन त्यांना मार्गदर्शन करीत होते. 20 ते 25 वयोगटातील 3 जण तर 32 वयोगटातील 2 जण होते. वॉलकंपाऊडच्या भींतीला लाकडी शिडी लावून त्यांनी घरात प्रवेश केला. बांधकामावर वापरण्यात येणारे सेंट्रींगचे साहित्य त्यांच्याजवळ होते.
पिंप्राळा हुडको भागात असलेल्या सिध्दार्थ नगरातील रिक्षा चालक योगेश मधुकर सोनार यांच्या घरातून चोरटय़ांनी पॅँटच्या खिशातील 17 00 रुपये तर कपाटात ठेवलेले प}ीचे 13 हजार रुपये लांबविले आहे. फ्रीजवर ठेवलेले बेंटेक्सचे दागिने व किरकोळ चिल्लर देखील त्यांनी नेली. सोनार व त्यांची प}ी पूनम या दोघांना कावीळ झाला असल्याने ते भेंडा फॅक्टरी येथे गेले होते. तेथून रात्री नऊ वाजता परत आले. औषधी घेतली असल्याने ते गाढ झोपले होते, त्यामुळे त्यांना जाग आली नाही.