ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 19 - कर्मचा:यांच्या अंगावर वाहने घालणे, त्यांना धमकावणे, अवैधरित्या वाळूचा उपसा करणे असे प्रकार वाढल्याची गंभीर दखल घेऊन अशी कृत्ये करणा:या वाळू व्यावसायिकांवर एमपीडीएची कारवाई प्रस्तावित असून काही जणांकडे असलेले रिव्हॉल्वर जप्त केले जाईल व शस्त्र परवाना रद्द करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. वाळूच्या अनधिकृत उपशाचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू असल्याने याची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिका:यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. यात प्रथम त्यांनी स्वत: गिरणानदी पात्रात जाऊन तेथील परिस्थितीचे अवलोकन केले. बेदरकारपणे वाहने चालवून निष्पाप व्यक्तींचे बळी वाळू डंपर व ट्रॅक्टरमुळे जातात. जळगावातील कल्याणी नगरातील देवांश कैलास भदाणे (वय 3) या निष्पाप बालकाचा गेल्या 19 एप्रिल रोजी बळी गेला होता. या प्रकाराची बाल हक्क आयोगाने दखल घेऊन जिल्हाधिका:यांना अहवाल देण्याचे आदेश केले आहेत. याबाबत माहिती घेणे सुरू असून आठवडाभरात बाल हक्क आयोगाला अहवाल पाठविला जाईल असे जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले. वाळू वाहतूक बंद केल्याचे संघटनेकडून सांगितले जाते मात्र कारवाईत वाहने जप्त होत आहेत. असे सांगून निंबाळकर म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री 9 वाजता धरणे आंदोलन करून दबाव निर्माण करणे हे सहन केले जाणार नाही. आता दादागिरी करणा:या व कर्मचा:यांच्या अंगावर वाहने नेणा:यांवर एमपीडी अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली जाईल. तर रिव्हाल्वर जप्तकाही वाळू व्यावसायिकांकडे रिव्हॉल्वरही आहेत. त्यांच्याकडील हे शस्त्र जप्त केले जातील. तसेच त्यांच्याकडे असलेले शस्त्र परवानेही जप्त केले जातील. अधिकृत ठिकाणी नियम पाळणा:यांची वाहने अडविली जाणार नाहीखडी क्रेशर, वीट भट्टी व्यावसायिकांवरही होणार कारवाई आर.टी.ओ. च्या मुंबई येथील पथकाकडूनही होणार कारवाई.
वाळू व्यावसायिकांविरुद्ध शस्त्र जप्तीचे ‘अस्त्र’
By admin | Published: May 19, 2017 1:55 PM