भुसावळ , जि.जळगाव : हतनूर प्रकल्पातून यावल, धरणगाव, चोपडा व अमळनेर येथील नगरपालिकेसाठी ९ रोजी उजव्या कालव्याद्वारे पाणी आवर्तन सोडण्यात आले आहे. भुसावळ येथे मात्र अद्यापही १५ तारखेपर्यंत म्हणजे सहा ते सात दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती, यावर येथील पाटबंधारे उपविभाग विभागाच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. दरम्यान, नदी पात्रातून सोडण्यात येणाºया पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्यामुळे संबंधित संस्थांतर्फे यापुढे पाईप लाईनची व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा तापी पात्रातून पाणी मिळणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.येथील तापी पात्राच्या बंधाºयातील पाणी ८ रोजी संपले आहे. त्यामुळे शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. हतनूर प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात यावे , अशी मागणी नगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे . मात्र ९ रोजी यावल, धरणगाव, चोपडा, अमळनेर या पालिकांसाठी उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी अमळनेरपर्यंत पोहोचल्यानंतर म्हणजे १५ तारखेच्या नंतर तापी पात्रातून सोडण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता चौधरी यांनी दिली.भुसावळ पालिकेसह दीपनगर विद्युत प्रकल्प, रेल्वे, आरपीडी, जळगाव एमआयडीसीसाठी मात्र नदीपात्रातून पाणी सोडावे लागत असल्यामुळे दोन ते चार दिवस म्हणजे १५ तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. १५ रोजी हतनूर प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतरही हे पाणी किमान पाच ते सहा दिवस शहरात येण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना या पाण्यासाठी तब्बल आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पाण्याची चोरी केल्यास गुन्हा दाखल होणारदरम्यान, तापी नदीपात्रातून त्याचप्रमाणे उजव्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी हे केवळ पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. हे पाणी सिंचनासाठी चोरून घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा गेटचे नुकसान केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पाटबंधारे खात्यातर्फे देण्यात आला आहे.भविष्यात नदीपात्रातून सोडणारे पाणी होणार बंददरम्यान, जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीतून नदीपात्रातून पाणी सोडल्यानंतर या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. बाष्पीभवन होते. त्यामुळे ३० ते १०० किलोमीटर अंतरासाठी २० टक्के पाण्याची मागणी असते. धरणातून मात्र ७५ ते ८० टक्के पाणी सोडावे लागते. पाण्याचा हा अपव्यय रोखण्यासाठी तापी नदी पात्रातून पाणी उचलणाºया भुसावळ पालिका, दीपनगर वीज केंद्र, रेल्वे, जलगाव एमआयडीसीसह सर्वच संस्थांनी पाण्यासाठी पाइपलाइनची व्यवस्था करून पाणी घ्यावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. ज्या संस्था नदीपात्राच्या भरवशावर राहतील, त्यांना भविष्यात पाणी मिळणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.‘अमृत’चे पाणी हतनूरच्या सोर्समधूनच घेणार- मुख्याधिकारी दोरकुळकरजिल्हाधिकाºयांच्या सूचनेसंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याशी संपर्क साधला असता, अमृत योजनेचे नियोजन प्रकल्पाच्या सोर्समधूनच करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे भविष्यात पाईपलाईन टाकूनच शहराला पाणी आणण्यात येणार आहे. यावर्षी भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे तापी नदी पात्रातील पाण्यावरच शहर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाºयांचा आदेश मात्र अद्यापही प्राप्त झाला नसल्याचे मुख्याधिकाºयांनी सांगितले.
तापीतून पाणी उचलणाऱ्या संस्थांनी पाइपलाइनची व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 7:35 PM
हतनूर प्रकल्पातून यावल, धरणगाव, चोपडा व अमळनेर येथील पालिकेसाठी ९ रोजी उजव्या कालव्याद्वारे पाणी आवर्तन सोडण्यात आले आहे. भुसावळ येथे मात्र अद्यापही १५ तारखेपर्यंत म्हणजे सहा ते सात दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती, यावर येथील पाटबंधारे उपविभाग विभागाच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले तापी नदी पात्रात १५ पर्यंत प्रतीक्षा