जळगाव : रेल्वे प्रशासनाने ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगदा उभारण्याला परवानगी दिली असून, या ठिकाणी असलेल्या नाल्यातील सांडण्याची व्यवस्था करुन, नवीन सुधारीत अंदाजपत्रक देण्याची मागणी, महापालिकेने रेल्वेच्या विभागीय अभियंत्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामामुळे शिवाजी नगर वासियांना, गेल्या दोन वर्षांपासून लेंडीनाला व सुरतगेट मार्गे वापर करावा लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगदा उभारण्याबाबत पाठपुरावा केल्यामुळे रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी भुयारी बोगदा उभारण्याला परवानगी दिली आहे. तसेच याबाबत ५ लाखांचे अंदाजपत्रकही मनपाला पाठविले आहे. मात्र, ब्राम्हण सभेजवळ मोठा सांडपाण्याचा नाला असल्याने, बोगदा उभारण्यापूर्वी या सांडपाण्याची व्यवस्था करण्याबाबत रेल्वेने व्यवस्था करावी, तसेच ही व्यवस्था करुन या कामाचे सुधारीत अंदाजपत्रक मनपाला पाठविण्याची मागणी केली आहे. तसेच याबाबत मनपाने आतापर्यंत रेल्वेला तीनवेळा पत्र पाठवूनही उत्तर मिळत
नसल्याबाबत उल्लेख केला आहे.