दीपक वाणी (क्र.८७)
प्रशांत खाचणे (८८)
हरीश वारके (८९)
जळगाव : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या दीपक उर्फ निखील किरण वाणी याच्यासह त्याला या गुन्ह्यात मदत करणाऱ्या प्रशांत निवृत्ती खाचणे व कल्पेश उर्फ हर्षल उर्फ हरी सुदाम वारके (सर्व रा.वराडसीम, ता.भुसावळ) या तिघांना एमआयडीसी पोलिसानी अटक केली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली आहे. यातील प्रशांत याची पत्नी सरपंच आहे.
अल्पवयीन मुलीला पळविल्याबाबत तिच्या मामाने २६ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. चौकशीत या तिघांनी या मुलीला गेवरा, ता.सावली, जि.चंद्रपूर येथे पळवून नेले होते. यात प्रशांत व कल्पेश यांनी मदत केली म्हणून त्यांनाही सहआरोपी करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील व रतिलाल पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. तिघांना रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.