जळगाव : अपहरण, पळवून नेणे व बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेला मुकुंदा विलास सपकाळे (वय २२, रा.वड्री, ता.यावल) याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी बुधवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुकूंदा सपकाळे याने गावातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. त्यामुळे त्याच्याविरुध्द यावल पोलीस स्टेशनला अपहरण, पळवून नेणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. पीडित मुलीच्या जबाबावरुन बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचे वाढीव कलम लावण्यात आल्यानंतर मंगळवारी यावल पोलिसांनी त्याला अटक केली होती.चक्कर आल्याच्या बहाण्याने दिला हाताला झटकाजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणीसाठी नमुने घेत असताना सपकाळे याने सहायक फौजदार नेताजी वंजारी यांना चक्कर येत असल्याचे सांगितले, त्यावर सपकाळे यांनी थोडावेळ खाली बस असे सांगितले असता त्यांच्या हाताला झटका देत सपकाळे याने रुग्णालयातून पळ काढला. आरोपी पळाल्याने घाबरगुंडी उडालेल्या नेताजी वंजारी व उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांनी मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पाठलाग केला, मात्र तो नवीन बी.जे.मार्केटकडून जुन्या बी.जे.मार्केटच्या दिशेन पळून गेला. त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले.
बलात्कार प्रकरणातील आरोपीचे पोलिसाच्या तावडीतून पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:12 PM
‘सिव्हील’मधील घटना
ठळक मुद्देतपासणीसाठी यावल येथून आणले होतेचक्कर आल्याच्या बहाण्याने दिला हाताला झटका