लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीस पळवून नेणाऱ्या गुन्हेगारास चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी २४ तासात जेरबंद करुन यशस्वी तपास केला. आरोपीस उद्या गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दि. २ रोजी ग्रामीण पोलिस स्थानकात दीड वर्ष वयाच्या चिमुकलीस अज्ञाताने पळविल्याची फिर्याद दाखल झाली. फिर्यादीने एका व्यक्तीवर संशयही व्यक्त केला. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आपल्या टीमला दिशा दिली. न्हावे, तरवाडे, धुळे व मालेगाव येथे शोध जारी केला. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या शोधासाठी मालेगाव येथे जाळे विणले. येथूनच चिमुकीस पळविणारा कृष्णा सोनवणे याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.
२४ तासात आरोपाली जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. पोलिस उपनिरीक्षक संपत अहिरे, पोलिस हेड काॅन्स्टेबल युवराज नाईक, पोलिस नाईक नितिन अमोदेकर, गोकुळ सोनवणे, दत्तात्रय महाजन, गोवर्धन बोरसे, जयंत सपकाळे, शांताराम पवार या तपास पथकात सहभागी झाले होते.
उद्या न्यायालयात हजर करणार
आरोपीला कृष्णा सोनवणे यास गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याने असेच काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना असून चौकशी केली जात आहे.