बोदवड : बोदवड तहसील कार्यालयात पुरवठा विभागात कार्यरत असलेले अव्वल कारकून संजय देविदास पाटील (वय ४१ रा. देवपूर जि. धुळे ) यास नवीन रेशन कार्ड बनवून देण्यासाठी तीन हजार ६०० रूपयांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंध खात्याच्या पथकाने मंगळवारी रंगेहात ताब्यात घेऊन सायंकाळी अटक केली. संजय पाटील याच्याविरूद्ध तो यापूर्वी अमळनेर येथे तहसीलला महसुल विभागात कारकुन म्हणून कार्यरत असताना तेथेही त्याच्यावर लाच लुचपत विभागाने कारवाई केली.तालुक्यातील ४८ वर्षीय तक्रारदार यांचे बोदवड तालुक्यात रेशन दुकान आहे. गावातील स्वस्त धान्य दुकानाच्या अंतर्गत येणाºया तीन नागरिकांकांचे रेशन कार्ड बनविºयासाठी आरोपी संजय पाटील याने प्रत्येक कार्डाप्रमाणे एक हजार २०० रूपये अशी एकूण तीन हजार ६०० रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.तक्रारदाराने वारंवार होणाºया त्रासाला कंटाळून जळगावच्या लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाºयाकडे तक्रार केली होती.सापळा रचून घेतले ताब्यातमंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संजय पाटील याला पथकातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. उपअधीक्षक जी.एम. ठाकूर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, अशोक अहिरे, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासिर देशमुख ,ईश्वर धनगर आदींनी ही कारवाई केली. संजय पाटील यांनी ताब्यात घेऊन हे पथक नंतर बोदवड पोलीस स्टेशनला रवाना झाले.दुसºयांदा कारवाईसंजय पाटील याच्यावर लाचलुचपत विभागाच्या पथकाने दुसºयांदा कारवाई केली आहे. यापूर्वी २०१७ मध्ये संजय पाटील हा अमळनेर येथील तहसील विभागातील महसूल शाखेत कार्यरत असताना वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती. त्यावरून त्याच्याविरूद्ध तक्रार झाल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याला अटक केली होती. या कारवाईनंतर पथकाने धुळ्यातील देवपूर येथील आरोपीच्या घराची घरझडती घेण्यासाठी रवाना झाले. तर संजय पाटील याला जळगाव येथे जिल्हापेठ पोलीस स्टेशनला हलविण्यात आले.
बोदवड येथे पुरवठा कारकुन लाच घेताना अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 7:19 PM