जळगाव : हिवाळा सुरु झाल्यानंतर आता बाजारपेठेत हळूहळू अनेक फळांनी कब्जा मिळवला आहे. लांबलेल्या पावसामुळे यंदा फळेही १५ ते २० दिवस उशिराने बाजारात दाखल झाली आहेत. पावसाने यंदा फळांची आवकही काहीशी मंदावली असून दरही १० ते ३० रुपयांनी वाढले आहेत.यंदा दिवाळीच्या मोसमातही तुफानी पाऊस झाल्याने हिवाळा काही दिवस लांबला तर पावसामुळे फळपिकांचे नुकसान झाले. तसेच हिवाळी फळांचा हंगामही लांबला आहे. पावसामुळे फळांची आवक मंदावली आहे. साधारणपणे हिवाळ्यात आवळ्याची जास्त प्रमाणात खरेदी होते. हा आवळा ज्यूस, आवळासुपारी वा कंटी बनवण्यासाठी जास्त करून वापरला जातो. यंदा आवळ्याची आवक काही प्रमाणात मंदावली आहे. दोन दिवसांपूर्वी ५० रुपये किलो असलेला आवळा मंगळवारी ४० रुपये किलो या दराने विकला जात होता. गेल्यावर्षी आवळ्याची ३० रुपये किलो दराने विक्री होत होती. जळगावात आलेला हा आवळा इंदोरवरून दाखल झाला असून या भागातही पावसामुळे आवळा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा दरात प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.नागपूरहून येणाऱ्या संत्र्यांनीही भाव खाल्ला आहे. गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट दराने सध्या संत्र्यांची विक्री सुुरु आहे. गेल्यावर्षी ४० रुपये किलो या दराने विकली जाणारी संत्री यंदा मात्र ८० रुपयांपर्यंत पोहोचली आहेत.यंदा गुजरातची बोरे स्थानिक जातीच्या बोरांपेक्षा लवकर दाखल झाली आहेत. गुजरातहून येणाºया चमेली बोरांचा सध्याचा दर हा ६० रुपये किलो असा आहे तर स्थानिक शेतकऱ्यांकडून बाजारपेठेत बोरांची आवक वाढल्यानंतर हा दर कमी होईल, असा अंदाज व्यापाºयांनी व्यक्त केला आहे.सीताफळे ८० रुपये तर पेरू ५० ते ६० रुपये किलो या दराने विकले जात आहेत. गेल्यावर्षी पेरू आणि सीताफळ यांचा दर हा ३० ते ४० रुपये किलो होता. यंदा या दरात चक्क दुपटीने वाढ झाली आहे. पावसामुळे ही दोन्ही फळे उशिराने दाखल झाली आहेतच; शिवाय आवकही कमी झाल्याने या दोन्ही फळांचे दर कमी होतील, असे सध्यातरी चित्र नाही, असे काही फळ विक्रेत्यांनी सांगितले. हंगाम लांबल्याचा फळविके्रत्यांना फटका बसल्याचे चित्र आहे़स्थानिक बोरांची आवक वाढल्यास दर कमी होणार.जळगावच्या बाजारपेठेत अजूनही चमेली बोरांचीच आवक आहे. जळगाव, मेहरूण येथील बोरांची आवक अजूनही झालेली नाही. नंदूरबारकडून येणाºया अॅपल बोरांचीही प्रतिक्षाच आहे. ही बोरे पुढील दहा दिवसात दाखल होतील, असा व्यापाºयांचा अंदाज आहे. ही बोरे बाजारपेठेत आल्यानंतर दर कमी होतील, असे व्यापाºयांनी सांगितले.मटारचीही आवकजबलपूर येथून मटारचीही (वाटाणे) आवक झाली असून गेल्या आठवड्यात मटारचे दर १०० ते १२० रुपये होते. मात्र आवक वाढल्याने आता हेच दर ८० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.सीताफळांचा हंगाम समाप्तीच्या मार्गावरसीताफळांचा हंगाम आणखी ४ ते ५ दिवसच राहील, असे काही व्यापाºयांनी सांगितले. सीताफळांचा हंगाम हा नवरात्रोत्सव ते दिपावलीदरम्यान सुरु होतो. यंदा हा हंगामही १५ दिवस लांबला. मात्र आता हा हंगाम समाप्तीच्या मार्गावर आहे, असे व्यापाºयांनी सांगितले.
हिवाळी फळांची आवक, पण मंदगतीने...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:27 PM