या कामासाठी त्यांना ३६ तास लागले. चित्राची साईज सहा बाय चार फूट आहे. तथागत गौतम बुद्धांना वैशाख पौर्णिमेला दिव्य ज्ञान प्राप्त झाले होते. त्यात सुजाताने गौतम बुद्धांना खीर खाऊ घातली. सुजाताला धम्मदीक्षा देण्यात आली. सुजाताच्या खीरमुळे सम्यक संबोधी पदपथावर सिद्धार्थ गौतम निघाले होते. अन्नत्यागाने ज्ञान प्राप्त होणार नाही हे त्यांना उमगले होते. म्हणून खीर या अन्नपदार्थाचे महत्व आहे. ४९ दिवसांचा उपवास पूर्ण केला. सिद्धार्थाची साधना त्यादिवशी पूर्ण झाली. गौतम बुद्धांचा चुलत भाऊ देवदत्त कायमच गौतम बुद्धांना कमी लेखत होता. गौतम बुद्धांच्या तो सतत तिरस्कार करत असे. एके दिवशी देवदत्तने निलगिरी हत्तीला ताडी पाजवून गौतम बुद्धांच्या येण्याच्या मार्गावर उभे केले. त्यावेळेला गौतम बुद्धांचे दर्शन घेऊन उन्मत्त झालेला निलगिरी हत्तीसुद्धा गौतम बुद्धांसमोर गुडघे टेकून जमिनीवर बसला. या चित्रात इहलोक आणि परलोक या दोन अलौकिक मानवी जीवनाचे महत्व गौतम बुद्धांच्या विचाराने किती पवित्र झाले आहे हे चित्र प्रदर्शित करते.
कलाशिक्षकाने रांगोळीतून साकारली भगवान बुद्धाची प्रतिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:18 AM