चोपडा तालुक्यात सह परिसरात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते आणि कापसाचे उत्पन्न घेतले जात परंतु यावर्षी अवेळी व अवकाळी पाऊस आणि कापूस पिकावर पडलेली बोंड अळीच्या प्रादुर्भाव यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. कापसाचे उत्पादन निम्म्यावर आलेला आहे कापसाला भाव देखील नाही बी बियाणे खत रासायनिक फवारणीची किंमत भरमसाठ वाढलेली आहे. त्यामुळे शेतकरी फक्त शेतात मेहनत करताना दिसत आहे त्याच्या हाती काहीच लागत नाही कापूस पिकावर पडलेली बोंड अळी मुळे शेतकरी पूर्णतः हताश झालेला आहे.
शेतातील उभे कापसाचे पिक उपटून शेतातच शेतकरी जाळतो आहे. त्या पिकावर कापसाची कैरी मोठ्या प्रमाणावर लागलेले आहे. परंतु बोंड अळी असल्याने ते पीक स्वतःच्या हाताने जाळताना त्या शेतकऱ्याच्या मनाला किती त्रास होत असेल याचे कल्पनाही सरकार करू शकणार नाही. सरकारच्या धोरणावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर संताप आणि नाराजी व्यक्त केलेली आहे. नुकसान ग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून कुठलही मदत मिळालेली नाही. एक रुपयाचा विमा मोबदला मिळालेला नाही सरकार फक्त आश्वासन देऊन मोकळे होत आहे. या पलीकडे काही करत नाही असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.