झालं ना मनासारखं. अहो, माङयावर किती राग? किती चिडचिड, किती संताप. केव्हा एकदाचा जातो, असंच झालंय ना तुम्हाला, चाललो बरं चाललो. आता परत आपली भेट एकदम पुढच्याच वर्षी. आला आता तुमचा लाडका मित्र. मी कोण तुमचा? तुमचं माझं काय नातं? अस्संच असतं. जो र्पयत माणसाला गरज असते तोवर आमचा लाडका मित्र असं म्हणायचं. आपला हेतू साध्य करायचा आणि मग.. जाऊ द्या. जगाची ही रितच न्यारी. अर्थात याला माझा स्वभाव. मी तरी काय करू माझा स्वभावच गरम आहे.
या ओळी वाचल्यावर तुम्हालाही जरा कोडचं पडलं असेल ना? अहो, हा सारा शब्दप्रपंच आत्ता आत्तार्पयत असलेल्या उन्हाळ्याबद्दल होता व आहे. त्याने त्याच्या मनीची भावना जशी व्यक्त केली तशीच भावना आपणदेखील व्यक्त केलीच असणार ना?
तसं म्हटलं तर उन्हाळा म्हणजे सुखद आठवणींचा काळ. उन्हाळा सगळ्यांशी दोस्ती करतो. महिला वर्ग तर वर्षभर लागणारे पापड, कुरड्रया, उपवासाचे विविध पदार्थ, तिखट, मसाला, हळद याच ऋतूत करतात. कडक उन्हाळ्यात वर्षभराचं धान्य वाळवून ठेवलं जातं आणि एकदाचं उन दाखवलं की महिलावर्ग खूष.
उन्हाळ्यात सुट्टय़ा असतात त्यामुळे आपल्या कुटुंबासोबत पर्यटनाला जाण्याचा बेत केला जातो. तो याच काळात. वार्षिक परीक्षा संपल्या की, बालमंडळी मामाच्या-मावशीच्या गावाला जाण्याची तयारी करतात. तिथं गेल्यावर खूप खेळणं, त्या - त्या गावाचं वैशिष्टय़ानुसार उपलब्ध असलेल्या पदार्थाचा आस्वाद घेतला जातो आणि मग परत आपल्या गावी आल्यावर त्या पदार्थाचं तोंडभरुन कौतूक केलं जातं. अरे तुला काय सांगू? माझा मामा ‘सुशीला’ खूप छान करतो. तू एकदा सोलापूरला जाऊन तर ये? या आणि इतर ब:याच गप्पांना रंगांना रंग चढत जातो आणि उन्हाळा सुसह्य होतो. इतकच काय तर पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्ये परत या-रे मुलांनो असं आगाऊ आमंत्रण घेऊन येतात. आणि बालमंडळी खरंच पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ांची वाट बघत बसतात.
महाविद्यालयातील मंडळी उन्हाळ्याच्या वर्गाना जाऊन विविध कोर्सेसचं शिक्षण घेतात. कथा, कादंब:या वाचनाला उत येतो. कोर्सेसचं शिक्षण ज्या संस्थेत घेतलं जातं तिथं भेटलेल्या मित्रमंडळींना ओळख ठेवण्याचं वचन दिले जातं.
उन्हाळ्याच्या सुट्टय़ा म्हणजे महिला वर्गाला पर्वणीचं असते. समर कॅम्प आयोजित केला जातो. यात खाद्यपदार्थ, मेहंदी, विणकाम, भरतकाम, या सा:या गोष्टी शिकवल्या जातात. आणि या समरकॅम्प मध्ये शिकलेली सरबतं मोठय़ा उत्साहात घरी करून बघितली जातात. आणि जेव्हा अरेùùùवाùù! फारच सुंदर! अशी पोच पावती मिळते तेव्हा ती गृहिणी देखील खूष होते आणि मी, आमच्या महिला मंडळाने आयोजित केलेल्या उन्हाळी वर्गात शिकले हे मोठय़ा अभिमानानं सांगते. आत्ता मला सांगा असं सारं चांगलं मिळवून देणारा उन्हाळा वाईट कसा? घरी आलेल्या पाहूण्याचं स्वागत केलं जाते ते आमरस, कुरड्रया, तळलेले पापड, भजी, आईस्क्रीम यांनी आणि मग काय वहिनी रस फारच सुंदर होता. कुठून आणले आंबे? माङया भावानं त्याच्या भाचांसाठी करंडी पाठविली होती. त्यातल्या आंब्यांचा हा रस, दर उन्हाळ्यात तो पाठवत असतो, असे सहज शब्द त्या माऊलीच्या मुखातून निघून जातात आणि आंब्याच्या रसाची चव मात्र पुढच्या उन्हाळ्यार्पयत तशीच राहते.
असा आहे उन्हाळ्याचा महिमा. त्याच्याबद्दल जेवढं चांगलं लिहावं तेवढं थोडच आहे. आता मात्र त्याच्याबद्दल एवढंचं परत भेटू येत्या उन्हाळ्यात एका वेगळ्या अनुभवांसोबत. आणि म्हणून आला उन्हाळा असं म्हणून कपाळावर आठय़ा न पाडता असा उन्हाळा सुरेख बाई असंच आपण म्हणू या! - नीना केसकर