शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

सिमी खटल्यात आसिफ व परवेज खान दोषी

By admin | Published: April 01, 2017 12:51 AM

न्यायालय आज शिक्षा सुनावणार : परवेज खानची रवानगी कारागृहात

जळगाव: देशभर गाजलेल्या जळगाव येथील सिमी (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया)च्या खटल्यात आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान (दोन्ही रा.जळगाव) या दोन्ही आरोपींना न्यायालयाने फौजदारी कट कारस्थान 120 (ब) या कलमान्वये शुक्रवारी दोषी ठरविले. देशविघातक कारवायांसाठी कट रचल्याचा गुन्हा दोघांविरुध्द सिध्द झाला असून शनिवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. अन्य कलमातून मात्र दोघांची निदरेष मुक्तता झाली आहे.  महाराष्ट्रात हिंदू वस्त्यांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रय} तसेच देशविघातक कृत्य करणा:या दहा जणांविरुध्द 25 जुलै 2001 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा निकाल 19 मे 2006 रोजी लागला होता. त्यात सहा जणांना शिक्षा झाली होती तर चार जण निदरेष मुक्त झाले होते.  गुन्ह्यात आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान (दोन्ही रा.जळगाव) या दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. 30 डिसेंबर 2006 रोजी आसिफला अटक करून 23 जुलै 2007 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते तर परवेजला 23 ऑगस्ट 2006 रोजी अटक करण्यात येऊन 20 ऑक्टोबर 2006 रोजी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या संपामुळे आज वकील उपलब्ध नाही, उद्या माङो वकील हजर राहतील असा अर्ज परवेज खान याने न्यायालयात सादर केला. न्या.पटनी यांनी तो अर्ज मंजूर करून शनिवारी शिक्षा सुनावली जाणार असल्याचे स्पष्ट करून परवेजची कारागृहात रवानगी केली. 48 साक्षीदारांचे जबाब कायमन्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात पूर्वीच्या खटल्यातील 48 साक्षीदारांचे जबाब सरकारपक्षाने कायम ठेवले. तसेच तपासाधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल धर्मराज ठाकरे, विधी व न्याय मंत्रालयाचे अवर सचिव उमराव देशमुख, हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील व शेख सुपडू शेख सायबु आदींच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले.आसिफ खान याला मुंबई लोकल रेल्वे बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने तो येरवडा कारागृहात आहे. त्याला दुपारी 3.05 वाजता व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला निकालाची माहिती देण्यात आली. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे 3.25 र्पयत त्यावर कामकाज चालले. आसिफ याच्यावतीने अॅड.ए.ए.खान (मालेगाव) व ए.आर.शेख (जळगाव) यांनी तर परवेज खान                      याच्यावतीने अॅड.सुनील डी.चौधरी यांनी कामकाज पाहिले. न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात सिमी खटल्याच्या निकालावर कामकाज सुरु असताना साडे तीन वाजेच्या सुमारास न्या.पटनी यांच्या न्यायालयाच्या बाहेर एक व्यक्ती संशयास्पद फिरत होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तुम्ही कोण माझी चौकशी करणारे असे उध्दटपणे त्याने उत्तर दिले. त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी त्याच्याकडे ओळखीचा पुरावा मागितला, असता तो देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. तो परवेजचा नातेवाईक असल्याची संध्याकाळी ओळख पटली. दहशतवादी विरोधी पथकाला माहिती देऊन त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.भ्रमणध्वनीवर बोलण्याची  परवानगीदोषी धरल्यानंतर परवेजची कारागृहात रवानगी करण्यापूर्वी न्यायालयाने त्याला कुटुंबात तसेच अन्य नातेवाईकात कोणाशी बोलायचे असेल तर बोलू शकतो अशी परवानगी दिली. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना बोलावून तशा सूचनाही दिल्या. त्यानंतर परवेजने कुटुंबाशी संपर्क साधला.सकाळपासून कडक बंदोबस्तनिकालाच्या पाश्र्वभूमीवर न्यायालय आवारात सकाळी अकरा वाजेपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर व त्यांच्या सहका:यांनी परवेजला कारागृहात रवाना केले.