रावेर : तोंडास मास्क का लावला नाही? अशी विचारणा केली असता रावेर येथे काही फळ विक्रेत्यांनी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्याशी वाद घालत त्यांच्या वाहन चालकास धक्काबुक्की केल्याची घटना गुरूवारी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी तिनही फळ विक्रेत्यांविरूद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.फैजपूर प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व वाहनचालक उमेश तळेकर हे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयाकडे येत होते. त्यांना चौकात मास्क न लावलेले तीन फळविक्रेते हे एका रिक्षात मास्क न बांधलेल्या ग्राहकाला फळ देतांना आढळूूून आले. त्यांना हटकले असता या विक्रेत्यांनी त्यांच्याशीच हुज्जत घातली व वाहनचालकास धक्काबुक्की केली. फळविक्रेते मलक मजीद मलक मुश्ताक, मलक मुुस्ताक मलक गफूर व मलक सादीक मलक गफूर अशी या फळ विक्रेत्यांची नावे आहेत. प्राांताधिकारी हे पोलीसांना घटना कळवून वाहनात बसत असतांना त्यांना संबंधित आरोपींनी वाहनात बसण्यास मज्जाव करून घेराव घातला. पोलीस थोड्याच वेळात दाखल झाले व या तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.प्रांत यांच्या वाहनाचे चालक उमेश तळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात भादंवि कलम ३५३, १८८, २६९, २७०, ३३२, ५०४, ३४ आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधक अधिनियम व मुंबई पोलीस कायदा कलम ४३ अन्वये गुन्हा दाखल आहे.
मास्कबाबत विचारणा करताच फैजपूर प्रांतांना घेरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 5:35 PM