शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

वाहतुकीच्या कोंडीचा एएसपींनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:10 AM

जळगावच्या सुरत रेल्वेगेटवरील प्रकार

ठळक मुद्देतब्बल साडे तीन तास नागरिक झाले हैराण

जळगाव : शहरातील सुरत रेल्वेगेटजवळ बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास साईडपट्टी खचल्याने त्यात ट्रक रुतून तब्बल साडे तीन तास वाहतूक कोंडी झाली. यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. यात सर्वात मोठा फटका बसला तो सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांना. ते स्वत: या वाहतुक कोंडीत दीड तास अडकले.दरम्यान, वाहतूक विभागाचे १५ ते १६ कर्मचारी, आरपीएफचे कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुनही ते निष्फळ ठरले. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.शिवाजीनगर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे सर्व वाहतूक ही दुध फेडरेशनकडील सुरत रेल्वेगेटकडून होत आहे. त्यातच सुरत रेल्वेगेट हे दिवसभरात येणाऱ्या-जाणाºया रेल्वेमुळे १९ ते २० वेळा बंद होते. यामुळे या गेटजवळ वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे.विद्यार्थ्यांना घरी जाण्यास विलंबदहावी व बारावीच्या परीक्षा सुरु असल्यामुळे दुपारी परीक्षा देवून घरी जाणाºया विद्यार्थ्यांचे या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड हाल झाले. दुपारी २ वाजेनंतर परीक्षा संपल्यानंतर ममुराबाद, आव्हाणे, कानळदा, विदगाव, भोकर या भागातील विद्यार्थी रात्री ८ वाजेपर्यंत घरी पोहचले. आपले पाल्य सायंकाळी ६ वाजेपर्यंत घरी न आल्याने पालक देखील चिंतेत होते. यामुळे अनेकांकडून आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना, बसस्थानकात फोन करत पाल्यांबाबतची माहिती घेतली. तर वाहतूककोंडीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनीही इतर नागरिकांच्या मोबाईलवरून पालकांना उशीरा येण्याचे कारण देत असल्याचे दिसून आले.वाहनधारकांमध्ये वादकोंडी इतकी भयंकर होती की, वाहनधारकांना आपले वाहने पुढे देखील सरकवता येत नव्हते. वाहनांचा धक्का लागल्यामुळे अनेक वाहनधारकांमध्ये चांगलाच वाद देखील झाले. काही वाहनधारकांची वाहनांवरुनच बाचाबाची झालेली पहायला मिळाली. तसेच पायी जाणाºया नागरिकांना देखील जागा शिल्लक नसल्याने अनेक नागरिक रेल्वे लाईनवरुन धोकेदायक पध्दतीने मार्ग काढत होते.आरपीएफचे जवानही वैतागलेवाहनांची संख्या वाढत जात असल्याने वाहतूक विभागाकडून या ठिकाणी अतिरीक्त कर्मचारी बोलविण्यात आले. तसेच रेल्वे पोलीसांनी देखील कर्मचारी बोलावून घेतले. त्यांनी देखील जिकरीचे प्रयत्न करुनही वाहतूक सुरळीत होत नसल्याने वाहतूक कर्मचारीही वैतागलेले होते.नीलाभ रोहन यांच्या सुरक्षा रक्षकाची कसरत... सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन हे अवैध धंद्यावर कारवाईसाठी जात असताना ते देखील वाहतूक कोंडीत साडेतीन तास अडकले होते. त्यांच्यासोबत आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीही वाहतूककोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही उपयोग झाला नाही. सायंकाळी ६.३० वाजता वाहतूक सुरळीत झाल्यानंतरच रोहोन यांचीही सुटका झाली.दहा ते बारा बसेसही अडकल्या... मालवाहतूक ट्रक, वाळूच्या ट्रॅक्टरमुळे या वाहतूककोंडीत अधिक भर टाकलेली पहायला मिळाली. रेल्वेगेटच्या दोन्हीही बाजूस दहा ते बारा बसेस अडकल्या होत्या. यामुळे बसेसचे संपूर्ण वेळापत्रक देखील कोलमडले होते. मालधक्क्याकडून येणारी सर्व वाहने देखील या ठिकाणी अडकले होते.चारही रस्त्यांवर लागल्या वाहनांच्या रांगाबुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मालगाडी कॉस झाल्यानंतर या गेटजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. गेटजवळ येणाºया एसके आॅईलमील कडील रस्ता, जुना हायवे, एसएमआयटी कॉलेज व रेल्वे मालधक्का या चारही रस्त्यांकडून एकाच वेळी वाहने आल्यामुळे ही वाहनांच्या रांगा लागल्या. त्यातच रेल्वेगेट पुन्हा-पुन्हा बंद होत असल्याने वाहनांची संख्या ही वाढतच गेली. यामुळे सुरत रेल्वेगेटपासून एसके आॅईल मील, निमखेडी नाका व एसएमआयटी कॉलेजपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहने जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने वाहनधारकांना या ठिकाणी उभ राहण्याशिवाय दुसरा पर्याय दिसून आला नाही.