झाडे वाळली
जळगाव : महामार्गाच्या बाजूला लावलेल्या झाडांना पुरेसे पाणी न मिळाल्याने यातील बहुतांश झाडे ही वाळली आहेत. त्यामुळे किमान उरलेल्या झाडांना तरी वेळेवर पाणी देण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. तसेच या झाडांचे संरक्षणदेखील करण्याची मागणी होत आहे.
कचरा उचलण्याची मागणी
जळगाव : देवेंद्रनगर परिसरात मोकळ्या प्लॉटमध्ये साचलेला कचरा उचलण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात घंटागाडी वेळेवर येत नसल्याने नागरिकही वैतागले आहेत.
नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे गरजूंना भोजन वाटप
जळगाव : येथील नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान फुड बँकतर्फे रस्त्यावरील निराधारांना भोजन दिले जाते. त्यात गुरुवारी जिल्हा रुग्णालयातील गरजूंना आणि त्यांच्या नातेवाइकांना जेवण वाटप करण्यात आले. या वेळी प्रभुदास जावळे, नकुल सोनवणे, धीरज जावळे उपस्थित होते.