आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.८- बाजार समिती आवारात रात्री उशिरा प्रवेश देण्याच्या कारणावरुन मधुकर श्रावण चौधरी (वय ५५ रा.ममुराबाद, ता.जळगाव) या वॉचमनला चेतन देवराम चौधरी (रा.दक्षता नगर, पोलीस लाईन, जळगाव) व गोविंद केदार बिर्ला (रा.प्रताप नगर, जळगाव) या दोघांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री साडे दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली. चेतन हा पोलिसाचा तर गोविंद हा व्यापा-याचा मुलगा आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मधुकर चौधरी हे कृषी उत्पन्न बाजार समितीत वॉचमन म्हणून कायम नोकरीला आहेत. सर्व दुकाने बंद झाल्यानंतर रात्री दहा वाजता बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वारही बंद केले जाते. चेतन व गोविंद हे दोन्ही जण बुधवारी रात्री साडे दहा वाजता बाजार समितीत आले. रात्री प्रवेश बंद असल्याने काही वेळ चौधरी यांनी गेट उघडले नाही. अलिशान कार असल्याने बाजार समितीचे पदाधिकारी किंवा व्यापारी असावेत म्हणून चौधरी यांनी गेट उघडले. यावेळी दोघांनी चौधरी यांना दमबाजी केली.
जळगावात पोलीस व व्यापा-याच्या मुलाकडून वॉचमनला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 4:53 PM
बाजार समिती आवारात रात्री उशिरा प्रवेश देण्याच्या कारणावरुन मधुकर श्रावण चौधरी (वय ५५ रा.ममुराबाद, ता.जळगाव) या वॉचमनला चेतन देवराम चौधरी (रा.दक्षता नगर, पोलीस लाईन, जळगाव) व गोविंद केदार बिर्ला (रा.प्रताप नगर, जळगाव) या दोघांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री साडे दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली.
ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समिती आवारात रात्री उशिरा प्रवेश देण्यावरून वादचेतन हा पोलिसाचा तर गोविंद हा व्यापा-याचा मुलगादोघांनी वॉचमन मधुकर श्रावण चौधरी यांना केली मारहाण