जळगाव : जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेसह अन्य योजनांच्या लाभार्थ्यांना मे महिन्यापर्यंतची आर्थिक मदत दिली गेली आहे, तसेच जून महिन्यातील प्रत्येकी एक हजार रुपये एवढी रक्कम देण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
जिल्ह्यात सध्या संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांचे २ लाख ४० हजार ४७२ एवढे लाभार्थी आहेत. त्यांच्या निवडीसाठी जिल्हा स्तरावर समिती आहे. ही समिती आलेल्या अर्जांमधून पात्र लाभार्थींची निवड करते आणि त्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. येथे स्वतंत्र प्रतीक्षा यादी नसते. २४ कोटी ०४ लाख ७२, ००० हजार रुपये एवढी रक्कम दरमहा वाटप केली जाते.
लाभार्थी संख्या
संजय गांधी निराधार अनुदान योजना ५८२८४
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ७८९०१
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना ८९४१५
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना १३३१४
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना ५५८