जळगाव : जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील सहाय्यक फौजदार सुनील शामकांत पाटील यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने शुक्रवारी पोलीस पदक जाहीर करण्यात आले. चाळीसगाव येथील पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र सारंगधर रानमाळे यांनाही हे पदक जाहीर झाले आहे.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती व पोलीस पदक जाहीर करण्यात येते. शनिवारी स्वातंत्र्य दिन पालकमंत्र्यांच्या हस्ते सुनील पाटील व रानमाळे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. सुनील पाटील हे उपनिरीक्षक पदाची ही परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. जळगाव जिल्ह्यातून फक्त या दोनच जणांना हे पदक जाहीर झाले आहे.
सहायक फौजदार सुनील पाटील यांना पोलीस पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 8:07 PM