चाळीसगाव, जि.जळगाव : येथील बी.पी आर्ट्स, एस.एम.ए सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स कॉलेज आणि के.आर.कोतकर ज्युनियर कॉलेजमध्ये सीताबाई मांगीलाल अग्रवाल स्मृती करंडक वादविवाद स्पर्धा गोपाळ नारायण उपाख्य भैय्यासाहेब पूर्णपात्रे स्मृती करंडक वर्क्तृत्व स्पर्धा व नारायण अग्रवाल गौरवार्थ करंडक उस्फूर्त वकृत्व सांघिक विजेते पद धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाने पटकावले.या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोमवारी सिने दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांच्या हस्ते करण्यात आले. मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायणदास अग्रवाल अध्यक्षस्थानी होते. संचालक क. मा. राजपूत, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, स्पर्धेचे परीक्षक आकाश पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.प्राचार्य डॉ.बिल्दीकर यांनी परिचय करून दिला तर आकाश पाटील यांनी दोन दिवस झालेल्या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच राजकुमार तांगडे आपल्या मनोगतात म्हणाले की, ज्या घरातील माता हुशार, समजदार, समजूतदार असते त्यांची मुले खरोखर हुशार असतात. आपले आईवडील आपल्या शिक्षणावर खूप पैसे खर्च करतात. त्यांना आपण कदापि विसरू नये. वक्तृत्वाची कला जर आपल्या अंगी असेल तर ती बॅण्डसारखी मिरवू नका तर लोकांपर्यंत ती घेऊन जा. आपण सामाजिक पालन करून समाजासाठी काहीतरी केले पाहिजे.अध्यक्षीय मनोगतात नारायणदास अग्रवाल म्हणाले की, यश मिळवणे सोपे असले तरी ते आपण टिकवून ठेवणे फार महत्वाचे आहे. यशासाठी प्रचंड मेहनतीची गरज आहे, तेव्हा कुठे आपण यश प्राप्त करू शकतो. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे. जेणेकरून आपला शैक्षणिक आलेख हा उंचावेल.सीताबाई मांगीलाल अग्रवाल स्मृती करंडक वादविवाद स्पर्धेतील विजेते असे-सांघिक विजय चिन्ह : एम.पी. लॉ कॉलेज, मालेगावप्रथम पारितोषिक तीन हजार रुपये- एम.एस.जी. कॉलेज, मालेगावद्वितीय पारितोषिक दोन हजार रुपये- एम.पी. लॉ कॉलेज, औरंगाबादतृतीय पारितोषिक दीड हजार रुपये- आंबेडकर लॉ कॉलेज, धुळेउत्तेजनार्थ पारितोषिक (प्रथम) ७५१ रुपये- एम.पी. लॉ कॉलेज, औरंगाबादउत्तेजनार्थ पारितोषिक (द्वितीय ) ७५१ रुपये- अग्रवाल कॉलेज, चाळीसगावसीताबाई मांगीलाल अग्रवाल स्मृती करंडक वक्तृत्व स्पर्धेतील विजेते असे-सांघिक विजय चिन्ह : विद्यावर्धिनी कॉलेज, धुळेप्रथम पारितोषिक तीन हजार रुपये- एम.पी. लॉ कॉलेज, औरंगाबादद्वितीय पारितोषिक दोन हजार रुपये- एम.जे.कॉलेज, जळगावतृतीय पारितोषिक दीड हजार रुपये- विद्यावधींनी कॉलेज, धुळेउत्तेजनार्थ पारितोषिक (प्रथम) ७५१ रुपये- बी.पी.आर्टस् कॉलेज, चाळीसगावउत्तेजनार्थ पारितोषिक (द्वितीय ) ७५१ रुपये- आर.सी.पटेल कॉलेज, शिरपूरशकुंतलाबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित नारायण अग्रवाल गौरवार्थ करंडक उस्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचे विजेते असे-प्रथम पारितोषिक तीन हजार रुपये- विद्यावर्धिनी कॉलेज, धुळेद्वितीय पारितोषिक दोन हजार रुपये- आंबेडकर लॉ कॉलेज, धुळेतृतीय पारितोषिक दीड हजार रुपये- विद्यावधींनी कॉलेज, धुळेउत्तेजनार्थ पारितोषिक (प्रथम) ७५१ रुपये- एम.पी.लॉ कॉलेज, औरंगाबादउत्तेजनार्थ पारितोषिक (द्वितीय ) ७५१ रुपये- एम.जे.कॉलेज, जळगावकार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धाप्रमुख डॉ.किरण गंगापूरकर यांनी, तर उपप्राचार्य अजय काटे यांनी आभार मानले.
वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेत धुळ्याच्या ‘विद्यावर्धिनी’ला सांघिक विजेते पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 7:36 PM
वादविवाद व वकृत्व स्पर्धेचे सांघिक विजेते पद धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाने पटकावले.
ठळक मुद्देवादविवाद व वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरणयशासाठी प्रचंड मेहनतीची गरज