शिरसोली येथून जवळच असलेल्या म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत शिरसोली, जळके, विटनेर, वडली, वावडदा, पाथरी, दहीगाव, दापोरा यासह अनेक गावे येतात. रोज नवीन कोरोना रुग्ण समोर येत असल्याने त्यांची तपासणी करून पुढील उपचारासाठी त्यांना कोविड केअर सेंटरला रवानगी करावी लागत आहे. तसेच सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणही सुरू असून म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत आता पर्यंत ६०० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. दोन्ही कामे एकाच वेळी करावी लागत असल्याने आरोग्य यंत्रणेत चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे.
लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश अग्रवाल, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. तेजस्वीनी देशमुख, आरोग्य सेविका रेणुका नेकणे, आरोग्य सेवक अनिल महाजन व नीलेश चौधरी यांनी सांगितले.
----------------------------------
कोरोना साथ सुरू झाल्यापासून ताण खूपच वाढला आहे. कोरोना तपासणी, लसीकरण या सोबतच रात्री-अपरात्री रुग्ण येत असल्याने त्यांना सेवा द्यावीच लागते.
डॉ. नीलेश अग्रवाल, वैद्यकीय अधिकारी, म्हसावद विभाग.