शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

"एकेकाळी कापसाला ७ हजार भाव मागणारे महाजन, आज मंत्री असताना फॉरेनला फिरतायंत"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 4:15 PM

कपाशीला ७ हजार भाव मागणारे गिरीश महाजन आता कुठे गेले, असा सवाल केला. 

जळगाव - जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात सातत्याने खटके उडत असतात. एकनाथ खडसेंकडूनगिरीश महाजनांवर टीका केली जाते, तर महाजनही त्या टीकेला पलटवार करताना दिसून येते. आता, पुन्हा एकदा खडसेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विदेश दौऱ्यावरुन त्यांच्यावर टीका केलीय. जामनेर येथील शेतकऱ्यांच्या विविध पिकाला हमीभाव मागणीसाठी जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे एक दिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात आले आहे. यावेळी, कपाशीला ७ हजार भाव मागणारे गिरीश महाजन आता कुठे गेले, असा सवाल केला. 

शेतकऱ्यांच्या कापसाला १५ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, कांद्याला पाच हजार रुपये हमीभाव देण्यात यावा पिक विमा कंपनीकडून मदत मिळावी, वन्यप्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. महावितरणा करून शेतकऱ्यांचे वीज तोडणी थांबवण्यात यावी, शेती पंपाला दिवसा बारा तास सुरळीत देण्यात यावी, अशा मागण्यासाठी एक दिवशी लक्ष उपोषण राष्ट्रवादीतर्फे जामनेर येथे करण्यात आले आहे.           आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले की, जळगाव जिल्ह्यामध्ये ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दोघे एकनाथ शिंदे व फडणवीस यांचे जवळचे असून त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाच्या हमीभावासाठी बोललं पाहिजे. कारण, जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कपाशी पिकाला भाव मिळत नाही, एकेकाळी गिरीश महाजन यांनी सात हजार रुपये कपाशीला भाव मिळण्यासाठी आंदोलन केले होते. मग, आता गेले कुठे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ते फॉरेन दौऱ्यावर फिरत आहेत, अशी टीकाही खडसे यांनी केली. 

आज शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही कपाशीला भाव नाही, ज्वारीला भाव नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील  झाला असून उद्या नवीन कपाशी पिकाची लागवड होणार आहे. मात्र कपाशीला भाव नसल्यामुळे आजही मागच्या वर्षाची कपाशी घरात पडून आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विधानसभेत आवाज उठवणार आहे अशी प्रतिक्रिया जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आलेल्या एकदिवसीय लक्षणिक उपोषण प्रसंगी बोलताना एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजनFarmerशेतकरी