रेल्वे स्टेशन :
सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वर्दळ असलेल्या रेल्वे स्टेशनवर स्टेट बॅंकेचे एटीएम बसविण्यात आले आहे. बाहेरगावी जाणारे बहुतांश प्रवासी व स्टेशनवरील बहुतांश रेल्वे कर्मचारी या एटीएमचाच वापर करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू असल्यामुळे, या ठिकाणच्या एटीएमवर प्रवाशांची नेहमी प्रमाणे गर्दी असल्याचे येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, रविवारीदेखील एटीएमवर सकाळपासून प्रवासी पैसे काढत होते. सायंकाळ पर्यंत एटीएममध्ये पैसे उपलब्ध असलेले दिसून आले.
नवीपेठ :
शहरातील नवीपेठेत विविध बॅकांचे एटीएम आहेत. यातील सेंट्रल बॅंकेचे एटीएम वगळता एकाही एटीएमवर गर्दी दिसून आली नाही. तसेच या ठिकाणच्या एटीएम सुरक्षारक्षकही दिसून आले नाहीत. मात्र, या बॅंकेतील एटीएममध्ये पैसे उपलब्ध असल्याचे या नागरिकांनी सांगितले. तसेच चौबे मार्केटमधील एचडीएफसी बॅंकेचे एटीएमही सुरू असलेले दिसून आले.
कोर्ट चौकातीलही एटीएमही सुरू
शहरातील कोर्ट चौकात एचडीएफसी, आयसीआय व महिंन्द्रा कोटक बॅंकेचे एटीएम आहे. यामध्ये एचडीएफसी बॅंकेतील पैसे उपलब्ध असल्यामुळे, एक व्यक्ती पैसे काढत असल्याचे दिसून आले. तसेच आयसीआय बॅंकेच्या एटीएमवरही एक व्यक्ती पैसे काढत असल्याचे दिसून आले. मात्र, या एटीएम शेजारीच असलेल्या महिंन्द्रा कोटक बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे नसल्याचे सुरक्षारक्षकाने सांगितले.
इन्फो :
क्रीडा संकुल परिसरातील एटीएममध्ये पैसे उपलब्ध
शहरातील नेहमी वर्दळ असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील स्टेट बॅंक एटीएम व महाराष्ट्र बॅंकेच्या एटीएम मध्येही पैसे उपलब्ध असल्याचे दिसून आले. नेहमी गर्दी असलेल्या स्टेट बॅंकेच्या एटीएम वर अधून-मधून नागरिक पैसे काढण्यासाठी येत होते. तर महाराष्ट्र बॅंकेच्या एटीएमवरही अशीच परिस्थिती दिसून आली. मात्र, या ठिकाणींही एकही सुरक्षा रक्षक दिसून आला नाही.
इन्फो :
दोन दिवसीय संपामुळे बॅंकाचे सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. मात्र,नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रविवारी सायंकाळीच स्टेट बॅंकेच्या शहरातील २६ एटीएम मध्येच पैशांचा भरणा केला जाईल. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे.
संदीप मोरडे, सचिव, स्टेट बॅंक ऑफिसर्स असोसिएशन, जळगाव
इन्फो :
संपामुळे नागरिकांना बॅंकेतील व्यवहार करता येणार नसल्याने, नागरिकांना एटीएमवर पुरेसा पैसा उपलब्ध करुन दिला जाणार आहे. रविवारी सायंकाळीच बॅंक ऑफ बडोद्यासह इतर बॅंकाच्या एटीएमवरही पैशांचा भरणा संबंधित बॅंकातर्फे केला जाईल. त्यामुळे एटीएमच्या माध्यमातून नागरिकांची पैशांची अडचण दुर होईल.
विकास कातयानी, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक, बॅंक ऑप बडोदा, जळगाव.
-