जळगाव : डेअरी प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटरशिपसाठी ३ लाख ३२ हजार रुपये आॅनलाईन वळते करुन घेतल्यानंतर कोणतीही एजन्सी न देता भुसावळच्या तरुणाची फसवणूक करणाऱ्या सुमनकुमार त्रिलोकीनाथ चौहान (वय ३०,रा. कंकर बाग पटना, बिहार) व अजयकुमार उपेंद्र सिंग (वय ३१, रा.साकेतपुरी, पटना, बिहार) या दोघांना सायबर क्राईम पोलिसांनी अटक केली.त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन लॅपटॉप, दोन मोबाईल व एक टेप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भुसावळ येथील सागर राजेश बत्रा (वय २२) या तरुणाने २४ सप्टेबर २०१८ रोजी पतंजली वेबसाईटरील क्रमांकावर संपर्क साधून संबंधितासाठी डेअरी प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटरशिपसाठी बोलणी केली होती. त्यानंतर संशयितांनी ३ लाख ३२ हजार रुपये आॅनलाईन त्यांच्या पंजाब नॅशनल बॅँकेत भरायला सांगितले. त्याप्रमाणे सागर याने ही रक्कम भरली, मात्र त्याला कोणतीच एजन्सी मिळाली नाही. फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सागर बत्रा याने सायबर क्राईम पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. निरीक्षक अरुण निकम यांच्या पथकाने गुन्ह्यात वापरलेले डिव्हाईसच्या आयपी अॅड्रेसवरुन संशयित निष्पन्न केले. याबाबत पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आदेशाने उपनिरीक्षक अंगत नेमाणे यांचे एक १ फेब्रुवारी रोजी पथक बिहारमध्ये गेले होते.
आॅनलाईन फसवणूक प्रकरणी २ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 11:00 AM
भुसावळच्या तरुणाला साडे तीन लाखाचा गंडा; बिहारमधून घेतले ताब्यात
ठळक मुद्दे सायबर क्राईम