शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

जळगावात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 1:12 PM

बाजार समितीत वर्चस्वाचा वाद

जळगाव : भाजप नगरसेविका मीना सपकाळे यांचे पती भाजप नेते धुडकू सपकाळे (रा.सिध्दीविनायक शाळेजवळ, अयोध्या नगर) यांच्यासह गजानन आनंदराव देशमुख (५४, रा.अयोध्या नगर) या दोघांवर कारमधून आलेल्या चार जणांनी प्राणघातक हल्ला केला. बुधवारी दुपारी दीड वाजता एमआयडीसी रस्त्यावरील राका चौकात ही घटना घडली. यात दोघे जण जखमी झाले आहेत. बाजार समितीत आपलेच हमाल पुरविण्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.हल्लेखोरांनी तलवार क्रिकेटच्या स्टम्पचा वापर केला. सपकाळे यांना खासगी तर देशमुख यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपकाळे व देशमुख हे कृषी बाजार समितीतून राका चौकाकडे जात असताना एका टपरीवर थांबले. तेथे ते संजय चव्हाण यांच्याशी गप्पा मारत असताना एका कारमधून आलेल्या (क्र.एम.एच.१९ बी.जे.१५७) चौघांनी खाली उतरुन सपकाळे व देशमुख यांच्यावर हल्ला चढविला. यापैकी नितीन याने सपकाळे यांच्यावर धारदार शस्त्राने तर अन्य लोकांनी देशमुख यांच्यावर क्रिकेटच्या दांड्याने हल्ला केला. सपकाळे यांनी हातावर तलवार झेलल्याने प्राण वाचले. देशमुख यांच्या डोक्यात दांडा मारण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जि.प.सदस्य पल्लवी देशमुख यांचे पती रवी देशमुख (रा.असोदा) यांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. हल्ला करणाऱ्यांमध्ये नितीन सोनवणे, कॉमेश सपकाळे, मयुर सपकाळे व भुरा कोळी यांची नावे पुढे आली आहेत. दरम्यान, डोक्याला मार लागल्यामुळे देशमुख यांची प्रकृती गंभीर आहे.दरम्यान, आमदार सुरेश भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह मनपाचे इतर नगरसेवक व विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.संघटनेचे कामबंद आंदोलनया हल्लयाच्या निषेधार्थ तसेच हल्लेखोरांच्या अटकेसाठी फळे व भाजीपाला हमाल-महिला जनरल कामगार संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले. रमेश बिºहाडे, संजय बोरसे, नितीन पाटील यांच्यासह ३३ जणांनी सभापतींना निवेदन सादर केले.हल्लेखोरांना अटक कराया घटनेनंतर आरपीयआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची भेट घेतली. हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी व या घटनेमागे नेमके कारण काय आहे याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे अडकमोल यांनी सांगितले. बहुजन क्रांती मोर्चाचे मुकूंदा सपकाळे यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे म्हटले आहे. आरपीयआय खरात गटाचे अध्यक्ष जे.डी.भालेराव यांनी हल्लेखोरांना तातडीने अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.पाच जणांविरुद्ध रात्री ११.३० वाजता दाखल झाला गुन्हाकॉमेश सपकाळे, मयूर इंद्रराज सपकाळे, नितीन प्रकाश सोनवणे, मनोज प्रकाश सोनवणे व कार चालक भुरा उर्फ विजय सपकाळे या पाच जणांविरुद्ध बुधवारी रात्री ११.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर तासाभरानंतर नितीन सोनवणे व कॉमेश सपकाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्ल्याच्या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजीत शिरसाठ, उपनिरीक्षक विशाल वाठारे, सहायक फौजदार अतुल वंजारी, गोविंदा पाटील व सहकाºयांनी तत्काळ घटनास्थळ व जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. जखमींकडून घटनेची माहिती जाणून घेतली.दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमीधुडकू सपकाळे व हल्लयातील मुख्य सूत्रधार नितीन सोनवणे या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. नितीन याचा मेहुणा कारागृहात खूनाची शिक्षा भोगत आहे तर धुडकू यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत. बाजार समितीत पंधरा दिवसापूर्वी झालेल्या वादाच्यावेळीच भविष्यात दोघांमध्ये मोठा वाद उफाळून येईल, असे संकेत मिळाले होते, मात्र पोलीस यंत्रणा गाफिल राहिली. तेव्हाच गुन्हा दाखल केला असता तर आज ही वेळ आली नसती.महिनाभरापूर्वी झाला होता वादधुडकू सपकाळे हे बाजार समितीत हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे समितीत सपकाळे यांचेच हमाल असून आता भविष्यात आपलेच हमाल व वर्चस्व असावे यावरुन नितीन प्रकाश सोनवणे (३०, रा.अयोध्या नगर) यांच्याशी वाद होता.महिनाभरापूर्वी हमाल पुरविण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. तेव्हा सपकाळे यांनी नितीनला मारहाण केली होती, पोलिसात प्रकरण जावूनही आपसात तडजोड झाल्याने तेव्हा गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :Jalgaonजळगाव