जळगाव : प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कारागृहातील दोन कैद्यांचे भांडण सोडविण्यास गेलेले तुरुंग अधिकारी किरण संतोष पवार यांच्यावर सचिन दशरथ सैंदाणे (३०) या कैद्याने लोखंडी पट्टीने वार केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता जिल्हा कारागृहात घडली.दरम्यान, या घटनेत पवार यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर कैदी सचिन सैंदाणे याने स्वत:चे डोके फोडून घेतले. सचिनने स्वत: डोके फोडले नसून अधिकाऱ्यांनी त्यालाच मारहाण केली व रुग्णालयातही नेले नाही, अशीही चर्चा होती. त्याचा अधीक्षकांनी इन्कार केला आहे.रक्षकाचा झटापटीत पाय मुरगळलाबॅरेकमध्ये आरडाओरड होत असल्याचे पाहून तुरुंगाधिकारी पवार यांनी बॅरेककडे धाव घेत सचिन व महेशचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यात सचिनने पवार यांच्यावर लोखंडी पट्टीने वार केले. यात पवार याच्या उजव्या हाताला मनगटाजवळ दुखापत झाली आहे. या झटापटीत कर्मचारी हिवरकर यांना दुखापत झाली. सैंदाणे याची यापूर्वीही वादाबाबत न्यायालयात तक्रार करण्यात आली आहे.पैशांच्या मागणीवरुन कैद्यांमध्ये भांडणशनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल प्राणघातक तसेच आर्म अॅक्टच्या गुन्ह्यात सचिन दशरथ सैंदाणे हा न्यायालयीन कोठडीत असून ३ आॅक्टोंबर २०१६ पासून कारागृहात आहे. तर महेश उर्फ डेम्या वासुदेव पाटील (२०) हा तालुका पोलीस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. सचिन याने सोमवारी सायंकाळी महेशकडे ५ हजार रुपयांची मागणी केली, मात्र त्याने त्याला नकार दिला.याच कारणावरुन मंगळवारी दोघांमध्ये वाद झाला व नंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी महेशचे तोंड दाबून धरल्याचे समजते.पाच हजार रुपये मागण्याच्या कारणावरुन दोन कैद्यांमध्ये वाद झाला. भांडण सोडविण्यास गेलेले तुरुंगाधिकारी यांनाही कैद्याकडून झटापटी झाली व त्यात ते जखमी झाले. कैद्याला अधिकाºयांनी मारहाण केलेली नाही. वरिष्ठांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.-अनिल वांढेकर, प्रभारी अधीक्षक
जळगावात कैद्यांच्या भांडणात तुरुंगाधिकाऱ्यावरच झाला हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 1:14 PM