भुसावळ, जि. जळगाव : वरणगाव फॅक्टरीच्या सुरक्षा रक्षकांवर एका वाहनातून आलेल्या अज्ञात चार-पाच व्यक्तींनी हल्ला केला. यात दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले. ही घटना १ मे रोजी पहाटे चारला दरबान मुख्य हॉस्पिटल पॉईंटजवळ घडली. अवैध धंदेचालकांनी हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांनुसार, वरणगाव फॅक्टरीतील सुरक्षा विभागात काम करणारे मनोज अहिरराव व शांताराम जोहरे आपली ड्युटी बजावत होते. तेव्हा हतनूरकडून एका चार चाकी वाहनात चार-पाच आले. दांडगाई करीत त्यांनी आम्हास फॅक्टरी इस्टेटमध्ये जाऊ द्या, असे सांगितले. परंतु सुरक्षारक्षकांनी तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगितले. गाडीत काय ठेवले हे बघण्यासाठी सुरक्षारक्षकांनी प्रयत्नही केला. त्यावेळेस यातील गुंडांनी रक्षकाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून जीवघेणा हल्ला चढवला. हॉकी स्टीकने मारहाण केली. मारहाण केल्यानंतर ते आलेल्या मार्गाने परत फिरले. सुरक्षारक्षकांच्या बॅटरीची व काठीची मोडतोड गुंडांनी केली.गाडीमध्ये गुटखा किंवा दारू असल्याची शंका व्यक्त होत आहे. सुरक्षारक्षकांना वरणगाव फॅक्टरीच्या रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. या घटनेने सुरक्षारक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ही घटना घडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. कर्नल अनिल मंकोटिया तसेच सुरक्षा विभागाचे कनिष्ठ कार्य प्रबंधक एन. पी. वाघ, एल.पी. इंगळे, कामगार संघटनांचे पदाधिकारी योगेश सूर्यवंशी, योगेश ठाकरे, संतोष बाऱ्हे, भानुदास सपकाळे, सुहास विभांडीक, कमलेश सिंग, मनीष महाले, गौतम सुरवाडे , आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा केला.
वरणगाव फॅक्टरीत सुरक्षा राक्षकांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 12:47 PM
भुसावळ , जि. जळगाव : वरणगाव फॅक्टरीच्या सुरक्षा रक्षकांवर एका वाहनातून आलेल्या अज्ञात चार-पाच व्यक्तींनी हल्ला केला. यात दोन ...
ठळक मुद्देदोन सुरक्षा रक्षक जखमी१ मे, पहाटे चारची घटना