चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी थकीत पगार एकरकमी मिळावेत या मागणीसाठी आंदोलन केले.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या टॅफ नॅप संघटनेच्या माध्यमातून ३१ आॅगस्टपासून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी शहरातील शिवाजी चौक येथे मागील १७ महिन्यांचे थकीत पगार शासकीय नियमानुसार एकरकमी मिळवेत, यासाठी हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. हा आंदोलनचा पहिला शनिवार होता.यात जे.वाय.भदाणे, एस.एस.पाटील, एल.जी.पाटील, आर.के.बडगुजर, यु.एस.अग्निहोत्री, डी.पी.शंकपाळ, एच.जी.माळी, एन.पी.विसपुते, वाय.एल. महाजन आदी कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला.
कर्मचारी संस्थेची बदनामी करीत आहेत-प्राचार्यचोपडा : येथील शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील काही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हल्लाबोल आंदोलन करून संस्थेची बदनामी करीत आहेत. त्यांच्या विरोधात आमचेही ठिय्या आंदोलन ७ सप्टेंबर रोजी करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एन.बोरसे व त्यांच्या सहका-यांनी दिली आहे. प्राचार्य बोरसे पुढे म्हणाले की, तंत्रनिकेतन महाविद्यालय हे विनाअनुदानित आहे. त्यामुळे अडचणी येत आहेत. हल्लाबोल करणारे कर्मचारी संस्थेची बदनामी करीत आहेत. यावेळी प्रा.एस.ई.शिसोदे, एन.आर.शिंदे, एस.एस.बाविस्कर, प्रणिती चौधरी, विजय चौधरी, एस.एम..पाटील, प्रमोद देशमुख, मनोज पाटील, संजय पाटील, यशवंत पाटील, कैलास सूर्यवंशी, मनोहर पाटील, जितू चावरे, कपिल कदम, नितीन देशमुख, समाधान पाटील उपस्थित आदी होते.