सर्वांच्या प्रयत्नाने कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न - तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाणजळगाव : सर्वांच्या समन्वयातून, सहकार्याने, प्रयत्नाने जळगाव तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडू, असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात होती. अचानक काही रुग्ण वाढले मात्र ज्यांची प्रतिकारक्षमता कमी अशाच व वृद्धांना अधिक लागण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.प्रश्न: तालुक्यात एकूण किती रुग्ण आहे?उत्तर : तालुक्यातील ग्रामीण भागात सदय स्थितीत एकूण १६ रुग्ण आहेत. अधिकतर रुग्णांचा रुग्णांचा शक्यतोवर शहराशी संपर्क आल्याने शिवाय ज्यांचे वय अधिक व प्रतिकार क्षमता कमी असल्याने लागण झाल्याचे दिसते. अचानक रुग्ण वाढीचे कारण असे स्पष्ट नाही.प्रश्न : रुग्ण वाढत असल्याने पुढील नियोजन कसे आहे?उत्तर : रुग्ण असलेल्या ठिकाणी सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली होती. बाहेरून आलेल्यांच्या याद्या तयार होत्या. बाहेरून आलेल्यांना १४ दिवस क्वारंटाईन केले जात होते. त्यांच्यावर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर या लक्ष ठेवून होत्या. काही दिवसांपूर्वी एक महिला बाहेरगावाहून आल्यानंतर त्या महिलेला क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर लक्षणे असल्याने स्वतंत्र ठेवण्यात आले होते. त्यामुळे पुढील धोका टाळता आला. सद्यस्थितीत सर्व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर स्थानिक पातळीवर मेहनतीने काम करीत आहेत. कर्मचाºयांनी नियोजनानुसार आता गावागावातील ६० वर्षांवरील वृद्ध मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या याद्या तयार करून अशा रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा रुग्णांना थोडाही काही लक्षण आढळल्यास प्राधान्याने त्यांची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे पुढील धोका टाळता येणार आहे.खाजगी डॉक्टरांनी सुरक्षित कवच परिधान करून रुग्णालय सुरू ठेवावे. रुग्णांवर उपचार करावे, लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य यंत्रणेला कळवावे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण कमी होणार आहे. शिवाय नागरिकांनी कसलीही भीती न बाळगता लक्षणे जाणवल्यास तपासणी करून घ्यावी, समोर यावे. यामुळे तत्काळ निदान होऊन पुढील धोका टाळता येणे शक्य होणार आहे. आरोग्य कर्मचा?्यांना नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. सर्वांच्या सहकायार्नेच ही कोरोनाची साखळी तोडता येणार आहे.आतापर्यंत किती लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे?तालुक्यात १२ रुग्ण आहेत. १०४ जण हायरिस्क कॉन्टॅक्ट क्वारंटाईन करण्यात आले आहेत तर ९० लो रिस्क कॉटेक्ट यांच्यावर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.सर्वांच्या समन्वयातून, सहकार्याने, प्रयत्नाने जळगाव तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडू. - डॉ. संजय चव्हाण , तालुका वैद्यकीय अधिकारी