जळगाव : जिल्हा हिवताप निर्मूलन कार्यालयातील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी भरतीसाठी हंगामी फवारणीचा बनावट दाखला सादर करुन नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रमोद बाबुराव राठोड (वय ३४, रा.कन्नड जि.औरंगाबाद), अरविंद बाबुराव जायभाये (वय ३५ रा. सिल्लोड, जि.औरंगाबाद) व संदीप प्रदीप बोराडे (रा.बुलडाणा) या तीन उमेदवारांसह त्यांना मदत करणाºया राजेंद्र पांडुरंग सानप (रा.पाटोदा, जि. बीड) व अजित दामोदर बुधेकर (रा. औरंगाबाद) या दोन दलालांना पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.जिल्हा हिवताप निर्मूलन अधिकाºयांंनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. अटक केलेला दलाल सानप हा बीड जिल्ह्यातील आष्टी ग्रामीण रुग्णालयाचा अधीक्षक असून त्याला अपहार प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे.पोलिसांनी लावला सापळाचंद्रपूर व नागपूर कार्यालयाच्या नावाने तिन्ही उमेदवारांनी सादर केलेले दाखले व कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अपर्णा पाटील यांनी नाशिक सहसंचालकांना कळविले, त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर या तिन्ही उमेदवारांना शुक्रवारी कागदपत्रे पडताळणीसाठी जळगावला बोलावण्यात आले. त्या दरम्यान अपर्णा पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील गायकवाड यांना साºया प्रकाराची माहिती दिली. गायकवाड यांनी उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी, महेंद्र बागुल, जगन सोनवणे, राजू मेढे व रवी नरवाडे यांचे पथक साध्या वेशात हिवताप कार्यालयात पाठविले. हे तिन्ही उमेदवार व त्यांना मदत करणारे राजेंद्र पांडुरंग सानप व अजित दामोदर बुधेकर असे पाच जण एकत्र येताच सापळा लावून बसलेल्या पथकाने त्यांना एकाचवेळी कागदपत्रासह ताब्यात घेतले.हिवताप निर्मूलन अधिकाºयांच्या सतर्कतेने प्रकार उघडहिवताप निर्मूलन अधिकाºयांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान आष्टी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधीक्षक असलेल्या सानप याच्यावर लातूर विभागाचे उपसंचालक डॉ.एच.आर.बोरसे व लेखापरिक्षकांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केलेली आहे.राष्टÑीय आरोग्य अभियानाच्या लेखापरिक्षण पथकाने ग्रामीण रुग्णालय, आष्टी येथील राष्टÑीय आरोग्य अभियान कार्यक्रमातील आर्थिक अनियमिततेच्या अनुषंगाने १ जून २०१३ ते २६ आॅगस्ट २०१६ या कालावधीतील लेखा परिक्षण केले.त्यांच्या अहवालानुसार या कालावधीत २६ लाख ४२ हजार ७४ रुपये इतकी रक्कम सानप यांच्याकडून वसूल करणे तसेच आर्थिक अनियमिततेस जबाबदार धरुन फौजदार गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. या प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत व्हाऊचर, अभिलेखे व नस्ती वरिष्ठांकडे सादर करण्याच्या सूचना डॉ.बोरसे यांनी सानप याला १७ जुलै रोजीच्या पत्राद्वारे केल्या आहेत.नागपूर सहसंचालकांचेही बनावट पत्र...चंद्रपूर कार्यालयाने तिन्ही उमेदवारांचे दाखले बनावट ठरविल्यानंतर २१ मे रोजी पुन्हा नागपूर येथील आरोग्य सहायक संचालकांचे पत्र जळगाव कार्यालयाला प्राप्त झाले. या तिन्ही उमेदवारांच्या दाखल्यांची पुन्हा पडताळणी केली असता त्यांनी काम केल्याचे दिसून येत असून ते नियुक्तीस पात्र असल्याचे या पत्रात नमूद केले होते.या पत्राबाबत मात्र जिल्हा हिवताप निर्मूलन अधिकारी अपर्णा पाटील यांना शंका आली. पाटील यांनी कनिष्ठ लिपिक नितीन लोखंडे यांना प्रत्यक्ष फोन करुन नागपूर कार्यालयातून माहिती घेण्यास सांगितले. त्यामुळे लोखंडे यांनी जावक क्रमांक असलेले तिन्ही उमेदवारांचे पत्र स्कॅन करुन इमेलद्वारे नागपूरला पाठविले. तेथील कर्मचाºयांनी पडताळणी केली असता या उमेदवारांनी सादर केलेले पत्र त्यांच्या कार्यालयाचे नसल्याने २३ मे २०१८ रोजी कळविण्यात आले.काय आहे प्रकरण?बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदभरती २०१६ च्या दुसरी समुपदेशन फेरी अंतर्गत प्रमोद बाबुराव राठोड, अरविंद बाबुराव जायभाये व संदीप प्रदीप बोराडे (तिन्ही रा.औरंगाबाद) या उमेदवारांना जिल्हा हिवताप कार्यालयात समुपदेशनासाठी बोलावण्यात आले होते. त्यांनी समुपदेशनाच्या दिवशी जिल्हा हिवताप अधिकारी, चंद्रपूर यांचा हंगामी फवारणी दाखल दिला होता. जळगाव कार्यालयाने या दाखल्यांच्या पडताळणीसाठी चंद्रपूर येथील कार्यालयाशी ५ मार्च २०१८ रोजी पत्राद्वारे विचारणा केली असता त्यात हे दाखले त्यांच्या कार्यालयाचे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.चंद्रपूर कार्यालयाने १७ मार्च रोजी दिलेले पत्र २२ मार्च रोजी जळगाव कार्यालयाला प्राप्त झाले.जानेवारी २०१६ मध्ये ५५ जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यातील २७ जागा भरण्यात आल्या आहेत. तिसºया फेरीची प्रक्रिया सुरु असताना तीन उमेदवारांच्या दाखल्यांवर शंका आली. पडताळणीत ते बनावट आढळल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलिसात तक्रार केली. सोबतचे अन्य दोन जण पोलिसांनीच चौकशीत निष्पन्न केले.-अपर्णा पाटील, जिल्हा हिवताप निर्मूलन अधिकारी