जळगाव : घरात शाळेची तयारी करीत असलेल्या सातवीच्या विद्यार्थिनीचा गुरुवारी सकाळी अकरा वाजता शनी पेठ परिसरातील इस्लामपुरा भागात अपहरणाचा प्रयत्न झाला. विद्यार्थीनीने आरडोओरड केल्याने संशयिताने पलायन केले. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडला नाही.इस्लामपुरा येथे ही विद्यार्थीनी कुटुंबासह राहते. गुरुवारी ही विद्यार्थीनी शाळेत जाण्याची तयारी करीत असल्याने आईने तिला शाळेत जाण्यापूर्वी दरवाचा बंद करुन घे असे सांगून मागील गल्लीत राहणाऱ्या बहिणीकडे निघून गेली. त्यानंतर पाच मिनिटांनी पांढरे कपडे परिधान केलेला ४५ ते ५० वयोगटातील एक व्यक्ती विद्यार्थीनीच्या घरात आला. अनोळखी व्यक्ती पाहून विद्यार्थीनी घाबरली. तिने तू कोण म्हणून जाब विचारला असता तोंडावर बोट ठेवून बोलू नको म्हणून इशारा केला. तोंड दाबायला येणार तितक्यात विद्यार्थीनीने हिने आरडाओरड केली. या संशयिताने खिडकीतून डोकावून पाहिले तर समोरच्या घरात तरुण झोपलेला होता. हा तरुण येण्याच्या भीतीने अपहरणकर्त्यांनी लगेच तेथून पळ काढला. गल्लीतून जाताना या व्यक्तीला अनेक महिलांनी पाहिले. विद्यार्थीनी ही के.के.उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.
जळगावात सातवीच्या विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 7:44 PM
घरात शाळेची तयारी करीत असलेल्या सातवीच्या विद्यार्थिनीचा गुरुवारी सकाळी अकरा वाजता शनी पेठ परिसरातील इस्लामपुरा भागात अपहरणाचा प्रयत्न झाला.
ठळक मुद्देजळगावातील इस्लामपुरामधील घटनाविद्यार्थिनीने आरडाओरड केल्याने संशयिताचे पलायनपोलिसांकडून संशयिताचा शोध सुरु