सांडपाण्याच्या टाकीत पडून तिघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात कंपनी मालक व कामगार यांच्याकडून देण्यात येत असलेल्या कारणांमध्ये तफावत आढळून आली. दिशाभूल करणारी माहिती मालकाकडून देण्यात आली. पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार मयूर सोनार व दिलीप सोनार हे दोघेजण पाण्याच्या टाकीत शिडी टाकून ते विषारी वायू असलेले सांडपाणी बादलीद्वारे बाहेर काढत होते. टाकीतील विषारी वायूमुळे मयूर यास चक्कर आली व टाकीत पडून त्याचा मृत्यू झाला. त्याला वाचविताना दिलीप सोनार खाली उतरले असता त्यांनाही विषारी वायूमुळे चक्कर आली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. नंतर कोळीचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे. कंपनीतील विषारी वायू असलेले सांडपाणी टाकीत सोडलेले असते. या विषारी वायूमुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, असे माहिती असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले म्हणून कंपनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
घटनेबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:14 AM