शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

चाळीसगावला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय देण्यासाठी प्रयत्नशील राहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 2:48 PM

वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन : न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी केले अश्वासित

ठळक मुद्देचाळीसगाव येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय सुरू होणे हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण असल्याची भावना न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांनी व्यक्त केली. ३१ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर हे न्यायालय हे स्थापन होतेय, याचाही त्यांनी उल्लेख केला.उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटींची पूर्तता झाल्यामुळे न्यायालय स्थापन होऊ शकले हे खरेच. परंतु यासाठी आमदार म्हणून उन्मेष पाटील यांनी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाच्या फाईलीला ‘धक्का’ देण्याचे काम केले आहे. यामुळे आमदार पाटील यांचा मंत्रालयातील पाठपुरावाजिल्हा न्यायाधिश गोविंदा सानप यांनी सांगितले की, जळगाव येथे दाखल असलेली एक हजार १५९ प्रकरणे आता चाळीसगाव येथे नव्याने सुरु झालेल्या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात वर्ग झाली आहे. कृषि विभागाच्या ताब्यात असलेल्या गट क्र. २२२ एक व दोन मधील १० हेक्टर ८६ आर जागे

चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव येथील वकील बांधवांसह न्यायदान क्षेत्राला सशक्त वारसा आहे. ज्याप्रमाणे वरिष्ठस्तर न्यायालय देण्यासाठी प्रयत्न केला, त्याचप्रमाणे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी आवश्यक अटींची पूर्तता केल्यास यासाठीदेखील जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहील, असे अश्वासित करून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी न्यायदानाची प्रक्रिया जलद करण्यासाठी आवाहनही केले.रविवारी सकाळी सव्वादहा वाजता न्यायमूर्ती गंगापूरवाला यांच्या हस्ते चाळीसगाव न्यायालयाच्या आवारात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व चाळीसगावचे भूमीपुत्र संगीतराव पाटील यांच्यासह जिल्हा न्यायाधिश गोविंदा सानप, चाळीसगावच्या नूतन वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश लक्ष्मीकांत पाढेन, चाळीसगाव वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल पाटील आदी उपस्थित होते.या वेळी वकील संघासह, न्यायालयीन कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना न्यायमूर्ती गंगापूरवाला म्हणाले, वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन झाल्याने संधी वाढणार आहे. येथील पक्षकार आणि वकीलवृंदास होणारा त्रासही थांबणार आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिल्यास चाळीसगाव येथेदेखील सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. त्यांनी मनोगतात न्यायदानाची प्रक्रिया गतीमान करण्यासह ‘नो पेंडसी’ हे तत्त्व पाळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रास्ताविकात अ‍ॅड. राहुल पाटील यांनी ३१ वर्षांपासून सुरू असलेला पाठपुरावा विशद केला. या वेळी माजी मंत्री एम.के. पाटील, आमदार उन्मेष पाटील, पं.स.सभापती स्मितल बोरसे, उदेसिंग पवार, प्रदीप देशमुख, प्रा. साहेबराव घोडे, उपसभापती संजय पाटील, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, जळगाव, पाचोरा, भुसावळ, भडगाव येथील वकील व सरकारी वकील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन चाळीसगाव न्यायालयाच्या न्यायाधीश अनिता गिरडकर यांनी केले. आभार जिल्हा न्यायाधिश लाडेकर यांनी मानले. 

टॅग्स :Courtन्यायालयChalisgaonचाळीसगाव