पिंपरखेड, ता.भडगाव, जि.जळगाव : पिंपरखेड येथे बँक आॅफ बडोदामध्ये चोरीचा प्रयत्न झाला, मात्र तिजोरी फोडण्यात चोरटे अयशस्वी झाले. यामुळे तिजोरीतील आठ लाख रुपयांवर रक्कम सुरक्षित राहिली. शनिवारी पहाटे पाऊणेचारच्या दरम्यान ही घटना घडली.पिंपरखेड येथे बडोदा बँकेची शाखा गावाबाहेर नवीन प्लॉट एरियात आहे. चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी सुरुवातीला सायरनच्या वायर कापल्या, नंतर आतील सीसीटीव्ही बॉक्स हार्ड डिस्कच्या वायर तोडल्या, तसेच आॅनलाईन सर्व्हरच्याही संपूर्ण वायर कापल्याचे दिसते. येथूनच चोरटे पुढे तिजोरीपर्यंत पोहोचले. मुख्य तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचे दिसते. परंतु चोरट्यांकडून तिजोरी काही फुटलेली नाही. या तिजोरीत आठ लाख १९ हजार ४९३ रुपये रोख रक्कम होती. ती सर्व सुरक्षित राहिली आहे.या बँकेत सुरक्षा रक्षक नाही. या बँकेत एकूण पाच कर्मचारी कार्यरत आहेत. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी मला नागपूर बोलावले होते. सकाळी मला या घटनेबाबत भ्रमणध्वनीवर समजले.-गिरी बाबू धनावत, शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ बडोदा, पिंपरखेड, ता.भडगावकाल बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मात्र संशयित कोणीही व्यक्ती आढळून आला नाही.-उमेश उपरीकर, उपव्यवस्थापक, बँक आॅफ बडोदा, पिंपरखेड, ता.भडगावचोरीचा प्रयत्न झालेला आहे. बँकेतील मुख्य हार्डडीस्क बॉक्स ताब्यात घेतलेला आहे. त्या पडताळणीतून काही मिळते का तो प्रयत्न करू.-आनंद एम.पराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भडगावमी या बँकेच्या शेजारी राहतो. पहाटे साडेचारला मला दरवाजा तोडण्याचा आवाज आला. मी बॅटरी चमकवली असता तोडाला रुमाल असलेल्या तीन-चार व्यक्त होत्या. बॅटरी चमकली असता ते पळून गेले.-प्रल्हाद बडगुजर (बँकेच्या शेजारील रहिवासी)
भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे बडोदा बँकेत चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 5:12 PM
पिंपरखेड येथे बँक आॅफ बडोदामध्ये चोरीचा प्रयत्न झाला, मात्र तिजोरी फोडण्यात चोरटे अयशस्वी झाले. यामुळे तिजोरीतील आठ लाख रुपयांवर रक्कम सुरक्षित राहिली. शनिवारी पहाटे पाऊणेचारच्या दरम्यान ही घटना घडली.
ठळक मुद्देगॅस कटरच्या सहाय्याने तोडला बँकेचा मुख्य दरवाजासीसीटीव्ही बॉक्स डिस्कच्या वायर तोडल्याआॅनलाईन सर्व्हरच्या संपूर्ण वायर चोरट्यांनी कापल्याचोरटे तिजोरीपर्यंत पोहोचले, मात्र तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसलातिजोरीतील सर्व आठ लाख रुपयांवर रक्कम सुरक्षित