वरणगाव : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत शस्त्रास्त्र निर्मितीसाठी आलेले साहित्य (कच्चा माल) लांबविण्याचा प्रय} फसल्यामुळे चोरटय़ांनी ट्रकचालकास बेदम मारहाण केली. आशिया महामार्गावर गुरुवारी पहाटे 3.30 ते चार वाजेच्या सुमारास हे थरार नाटय़ घडले. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. वाहनाचा चालक व मालक राजेश लक्ष्मण सुरवाडकर (रा.गणपतीनगर, वरणगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी येथून ट्रक क्र.(एमएच 19-ङोड 1362) मध्ये शस्त्रनिर्मितीसाठी लागणारे नऊ टन एवढे ब्रास कंप घेऊन सुरवाडकर हे 18 रोजी वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथे पोहोचले. त्यांना तासभर विलंब झाल्यामुळे ट्रकमधील साहित्य खाली करून घेण्यास प्रशासनाने नकार दिला आणि उद्या सकाळी ट्रकमधील साहित्य खाली केले जाणार असल्याचे चालकास सांगितले. ट्रकचालकाने ऑर्डनन्स फॅक्टरीतून ट्रक ओळखीच्या गॅरेजवर लावला आणि ते ट्रकच्या कॅबिनमध्येच झोपले होते. मध्यरात्री चोरटय़ांनी ट्रकवरील ताडपत्री काढून ब्रॉस कंपच्या गोण्या त्यांच्या जवळील ट्रक क्र.(एम.एच.38 सी.8987) मध्ये भरण्यास सुरूवात केली. ट्रकमध्ये कुणी तरी चढल्याची चाहुल सुरवाडकर यांना लागली. तो र्पयत चोरटय़ांनी 238 पैकी 29 गोण्या या ट्रकमध्ये भरल्या. सुरवाडकर यांनी विरोध करताना चारही चोरटय़ांनी त्यांना मारहाण करीत ट्रक पळविला परंतु सुरवाडकर यांनी प्रसंगावधान राखत चोरटे पळवित असलेल्या ट्रकच्या स्टेअरिंगलाच ते लटकले यामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला लिंबाच्या झाडावर आदळला. याचा फायदा घेऊन ट्रकमधील चोरटे पसार झाले. रात्रीच्यावेळी काही लोकांना जखमी अवस्थेत एक अनोळखी रस्त्यावर आढळून आला. त्यांनी त्यास पोलिसांकडे आणले असता चौकशीत तो चार चोरटय़ापैकी एक असल्याचे निष्पन्न झाले. राजेश सुरवाडकर यांच्या फिर्यादीवरून प्रभातसिंग रुपसिंग पटेलिया (रा.नाडा,ता.सहेरा, जि.पंचमहल (गुजरात) व अन्य तीन विरोधात नऊ लाख रुपये किमतीचे ब्रॉस कंप लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटय़ांनी वापरलेला ट्रकचा नंबर प्लेट बदलविण्याचे निष्पन्न झाले असून ट्रक चोरीचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपास उपनिरीक्षक नीलेश वाघ, हवालदार सुनील वाणी, मझहर पठाण करीत आहे. आरोपीस अटक करण्यात आली.
शस्त्रनिर्मितीचे साहित्य चोरण्याचा प्रय} फसला
By admin | Published: January 20, 2017 12:49 AM