जळगाव : मनपा निवडणुकीतील खर्चाचा हिशेब व उर्वरित रक्कम परत दिल्यानंतरही पैशांच्या तगाद्यामुळे मनोज मुरलीधर अटवाल (३०, रा. चौघुले प्लॉट, शनिपेठ) या तरुणाने फिनायल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपचे आपण शक्ती प्रमुख असल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी मनोज अटवाल यांचा जबाब घेतला आहे.या बाबत जिल्हा रुग्णालयात अटवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मनपा निवडणुकीत एका अपक्ष उमेदवार असलेल्या महिलेने मनोज अटवाल यांच्याकडे अर्ज घेणे, दाखल करणे व इतर खर्चासाठी २० हजार रुपये दिले होते. त्यानुसार अर्जाचे शुल्क व दाखल करणे तसेच इतर खर्च मिळून ११ हजार रुपये खर्च झाल्याचे अटवाल यांचे म्हणणे आहे. त्यानंतर सर्व हिशेब व उर्वरित ९ हजार रुपये आपण संबंधित महिलेला तिच्या जावयासमोर परत केल्याची माहिती मनोज अटवाल यांनी दिली. तरीदेखील ती महिला आपल्याकडे २० हजार रुपये व त्यावरील व्याजासाठी तगादा लावत आहे.३१ आॅक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलो असता तेथेदेखील मला फोन आला व मला या महिलेने पुन्हा धमकावले. त्यामुळे मी या सर्व प्रकारास कंटाळून तणावात रेल्वे रुळावर गेलो. मात्र तेथून माघारी परतलो व फवारणीचे औषध घेण्यासाठी गेलो. तेथे दुकानदारांनी फवारणीचे औषध देण्यास नकार दिला. अखेर मी चौबे मार्केटसमोरील शाळा क्रमांक २८ च्या मागे फिनायल प्राशन केले. तेथे मला माझ्या मित्राचा फोन आला व त्याने विचारपूस केली. अखेर तो घटनास्थळी पोहचला व तेथून मित्रांनी उचलून मला जिल्हा रुग्णालयात आणल्याची माहिती अटवाल यांनी दिली.भाजपाकडून सदर महिला निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होती. मात्र उमेदवारी नाकारल्याने त्या अपक्ष उभ्या राहिल्या व पराभूत झाल्या. त्यांनी पैशासाठी माझ्याकडे तगादा लावल्याने आपण त्रस्त झालो. या बाबत आपण पोलिसांकडे जबाब दिला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अटवाल यांनी केली आहे.पोलीस अधिकाऱ्यांचीही धमकीपैशासाठी मला सतत शिवीगाळ केली जात असून ९ आॅक्टोबर रोजी मला महिलेने घरी बोलावले व शनिपेठ पोलीस ठाण्यातील एक अधिकारी झाले नातेवाईक असून माझे काहीही होऊ शकत नाही, अशी धमकी दिली. तसेच त्या अधिकाºयास भ्रमणध्वनी केला. त्या वेळी पैसे देऊन टाक अन्यथा तुझ्यावर गुन्हा दाखल करेल अशी धमकीदेखील या अधिकाºयाने दिल्याचा दावा अटवाल यांनी केला. दुसºया दिवशी आपण पोलीस ठाण्यात गेलो असता आपल्याला हाकलून दिले, असेही अटवाल यांचे म्हणणे आहे.
पैशांचा तगादा लावल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 1:04 PM
मनपा निवडणुकीतील खर्चाचा वाद
ठळक मुद्दे जिल्हा रुग्णालयात उपचारपोलीस अधिकाऱ्यांचीही धमकी